10वी नंतर ITI – Courses, Trades, Admission आणि Career Guide (2026)

Career Overview Card

Eligibility

Fees

Skills

Duration

Scope

Age Limit

---

IMPORTANT LINKS

10वी नंतर ITI कसा करावा? बेस्ट ट्रेड्स (Electrician, Fitter, Wireman), DVET प्रवेश प्रक्रिया, रेल्वे व महावितरण भरती, पगार आणि २०२६ चा सविस्तर करिअर गाईड.

मे महिन्यात दहावीचा (SSC Board) निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न असतो: “मला जास्त वर्ष थिअरीचा अभ्यास करायचा नसेल आणि लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, तर कोणता पर्याय माझ्यासाठी सर्वोत्तम राहील?” याचे सर्वात अचूक आणि खात्रीशीर उत्तर म्हणजे ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था).

महाराष्ट्रात दरवर्षी हजारो तरुण पारंपारिक पदवी घेण्याऐवजी ITI कोर्सेसची निवड करतात. याचे कारण ITI मध्ये पुस्तकी पाठांतरापेक्षा प्रात्यक्षिक काम (Practical Skills) शिकण्यावर जास्तीचा भर दिला जातो. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET Maharashtra) अंतर्गत चालवले जाणारे हे कोर्स पूर्ण केल्यानंतर महावितरण, भारतीय रेल्वे, सार्वजनिक उपक्रम (PSUs) आणि राज्यातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये (MIDC) तात्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जातात.

ITI मध्ये विद्यार्थ्यांना विविध Technicals आणि Vocational trades चे परिपूर्ण व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते. Electrician, Fitter, Welder, COPA, Mechanic, Electronics Mechanic यांसारख्या अनेक ट्रेडस इथे शिकवले जातात. प्रत्येक ट्रेंड्स ची Eligibility आणि Training duration वेगवेगळी असते.

या परिपूर्ण मार्गदर्शकामध्ये आपण १०वीनंतर ITI चे टॉप ट्रेड्स, ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया, लागणारी कागदपत्रे, अप्रेंटिसशिप (Apprenticeship), मिळणारे पगार आणि पुढे भविष्यात मिळणाऱ्या संधी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जर तुम्ही 10वी नंतर ITI करण्याचा विचार करत असाल, तर फक्त “ITI म्हणजे काय?” एवढे जाणून घेणे पुरेसे नाही. तुम्हाला हे देखील तितकेच समजून घेणे गरजेचे आहे:

  • ITI मध्ये कोणकोणते Trades असतात?
  • कोणता Trade कोणासाठी योग्य आहे?
  • Electrician, Fitter आणि COPA मध्ये काय फरक आहे?
  • ITI चा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
  • प्रवेश प्रक्रिया कसे होते?
  • Government ITI आणि Private ITI मध्ये काय फरक आहे?
  • ITI नंतर लगेच नोकरी मिळतो का?
  • Apprenticeship म्हणजे काय?
  • ITI नंतर पुढे Diploma करता येतो का?
  • ITI नंतर Government Job साठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत?

या संपूर्ण मार्गदर्शनामध्ये हे सर्व मुद्दे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

Quick Summary: ITI बद्दल महत्त्वाची माहिती

तपशील (Key Details)माहिती (Highlights)
पूर्ण नाव (Full Form)Industrial Training Institute (औद्योगिक प्रशिक्षण संस्था)
नियामक मंडळ (Regulating Body)DGT (केंद्र स्तर) आणि DVET Maharashtra (राज्य स्तर)
सर्टिफिकेट प्रकार (Certifications)NCVT (राष्ट्रीय स्तर – National) / SCVT (राज्य स्तर – State)
पात्रता (Eligibility)१०वी उत्तीर्ण (काही ट्रेड्ससाठी ८वी पास किंवा १०वी अनुत्तीर्ण)
कोर्सचा कालावधी (Course Duration)१ वर्ष ते २ वर्षे (२ ते ४ सेमिस्टर)
प्रवेश पद्धत (Admission Mode)१०वीच्या गुणांच्या मेरिटनुसार ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश (CAP)
सरकारी नोकरीच्या मुख्य संधीभारतीय रेल्वे (ALP & Technician), महावितरण, DRDO, ISRO, PWD
सरासरी सुरुवातीचा पगार₹१५,००० ते ₹२८,००० प्रति महिना (अनुभवानुसार वाढ)

10वी नंतर ITI म्हणजे काय?

ITI चा दीर्घ स्वरूप बघायचे झाले तर Industrial Training Institute.

ITI चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट ट्रेड मध्येPpractical आणि Job-oriented technical Skills देणे हा आहे. ITI हा भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत (MSDE) चालवला जाणारा व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक यंत्रसामग्री, वायरिंग, वेल्डिंग, मशिनिंग आणि सॉफ्टवेअर टूल्सचे थेट प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाते. सोप्या भाषेत:

10वी → ITI Trade → Practical Skills → Exam/Certification → Apprenticeship/Job/Further Education हा ITI चा हा एक साधारण मार्ग आहे जो सर्वासाठी सारखाच असेल असे नाही

ITI मध्ये प्रवेश घेताना दोन प्रकारची प्रमाणपत्रे:

अ. NCVT (National Council for Vocational Training)

  • हे राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र असते.
  • संपूर्ण भारतात आणि परदेशातही (खास करून गल्फ देश आणि युरोप) या प्रमाणपत्राला थेट मान्यता मिळते.
  • भारतीय रेल्वे, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि केंद्र सरकारच्या भरतीसाठी NCVT उत्तीर्ण उमेदवारांना प्रामुख्याने प्राधान्य मिळते.

ब. SCVT (State Council for Vocational Training)

  • हे राज्य स्तरावरील प्रमाणपत्र असते.
  • संबंधित राज्यापुरती (उदा. महाराष्ट्र शासन) या प्रमाणपत्राला पूर्ण मान्यता असते.
  • टीप: शक्य असल्यास विद्यार्थ्यांनी NCVT संलग्न ट्रेड्सना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे ठरते, भविष्यातील उत्तम संधीसाठी देखील खूप उपयुक्त राहते.

10वी नंतर ITI चे मुख्य फायदे

1. Practical Skills वर Focus

ITI मध्ये व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित व्यावहारिक प्रशिक्षण ला खूप महत्त्व दिले जाते. फक्त पाठयपुस्तकातील थेअरी ऐवजी विद्यार्थ्याला Actual tools, equipments, Workshop किंवा Lab environment मध्ये काम करण्याचा अनुभव इथे परिपूर्ण दिलाजातो. DGT च्या CTS Framework मध्ये Trade technology, Practical training आणि Employability Skills यांचा प्रामुख्याने समावेश असतो.


2. विशिष्ठ ट्रेड्स मध्ये Specialization

11वीमध्ये व्यापक शैक्षणिक प्रवाह निवडण्याऐवजी ITI मध्ये सुरुवातीपासूनच Specific Trade निवडता येतो. उदाहरण:

  • Electrician → Electrical skills
  • Fitter → Fitting/Mechanical skills
  • COPA → Computer/Programming-related skills

या Specific Trade मुळे विद्यार्थ्याला एका तांत्रिक शिक्षणा मध्ये सुरुवातीपासून लक्ष्य केंद्रित करता येते.


3. Job-oriented Training

ITI चा रोजगारक्षम व्यावसायिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात जास्त भर असतो. DGT च्या CTS चा उद्देश कुशल कर्मचारी वर्ग तयार करणे आणि Industries साठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा आहे. पण याचा अर्थ ITI केल्यावर नोकरीची हमी मिळतेच असा होत नाही.

Job साठी Skills, Real World Practical ability, Apprenticeship experience, Communication आणि संबंधित Employer ची आवश्यकता देखील महत्त्वाची असतात.

१०वीनंतरचे टॉप ITI ट्रेड्स (Engineering & Non-Engineering)

ITI मधील कोर्सेसचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात: इंजिनिअरिंग ट्रेड्स (तांत्रिक) आणि नॉन-इंजिनिअरिंग ट्रेड्स (बिगर-तांत्रिक).

अ. टॉप इंजिनिअरिंग ट्रेड्स (Engineering Trades – हाय डिमॅंड)

१. इलेक्ट्रिशियन (Electrician) – कालावधी: २ वर्षे

  • कामाचे स्वरूप: घरगुती व औद्योगिक विद्युत वायरिंग, ट्रान्सफॉर्मर्स, मोटर्स, जनरेटर्सची दुरुस्ती आणि देखभाल.
  • नोकरीच्या संधी: महावितरण (MSEDCL विद्युत सहाय्यक भरती), भारतीय रेल्वे, खाजगी वीज प्रकल्प आणि स्वतंत्र इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स मिळवून काम करता येते.
  • विशेष: महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत सर्वाधिक मागणी असणारा ट्रेड.

२. फिटर (Fitter) – कालावधी: २ वर्षे

  • कामाचे स्वरूप: मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्समध्ये मशिन्सचे विविध भाग जोडणे (Assembly), लेथ मशीनवर काम करणे आणि पाईप फिटिंग.
  • नोकरीच्या संधी: टाटा मोटर्स, भारत फोर्ज, डिफेन्स युनिट्स, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि MIDC मधील उत्पादन कंपन्या.

३. वायरमन (Wireman) – कालावधी: २ वर्षे

  • कामाचे स्वरूप: पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, पोल वायरिंग आणि अंतर्गत(Internal) वायरिंग.
  • विशेष: हा कोर्स पूर्ण झाल्यावर शासकीय वायरमन परमिट मिळते, ज्याच्या आधारे स्वतःचा व्यवसाय किंवा सरकारी कंत्राटदारी सुरू करता येते.

४. मोटर मेकॅनिक / MMV (Mechanic Motor Vehicle) – कालावधी: २ वर्षे

  • कामाचे स्वरूप: Four Wheeler, ट्रक, बसेस आणि आधुनिक हायब्रिड व इलेक्ट्रिक वाहनांची (EV) दुरुस्ती.
  • नोकरीच्या संधी: महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटर्स आणि MSRTC (एस.टी. महामंडळ) मध्ये पदांची भरती होत असते.

५. वेल्डर (Welder) – कालावधी: १ वर्ष

  • कामाचे स्वरूप: ARC, TIG, MIG, गॅस वेल्डिंग आणि धातू जोडकाम.
  • विशेष: फक्त एका वर्षाचा कोर्स करून शिपयार्ड्स, रिफायनरीज, पाईपलाईन प्रोजेक्ट्स आणि गल्फ देशांमध्ये (दुबई, कतार, सौदी) प्रचंड पगाराच्या संधी मिळतात.

६. मशीनिस्ट आणि टर्नर (Machinist & Turner) – कालावधी: २ वर्षे

  • कामाचे स्वरूप: लेथ मशीन, CNC (Computer Numerical Control) आणि VMC मशिन्स ऑपरेट करणे.
  • नोकरीच्या संधी: ऑटोमोबाईल आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होते.

ब. टॉप नॉन-इंजिनिअरिंग ट्रेड्स (Non-Engineering Trades)

१. COPA (Computer Operator and Programming Assistant) – कालावधी: १ वर्ष

  • कामाचे स्वरूप: डेटा एन्ट्री, बेसिक प्रोग्रॅमिंग (HTML, JavaScript, Tally), इंटरनेट ऑपरेशन्स आणि बेसिक एमएस ऑफिस.
  • नोकरीच्या संधी: बँका, सरकारी कार्यालये, शाळा-कॉलेजेसमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ऑफिस असिस्टंट.

२. डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर (DTP Operator) – कालावधी: १ वर्ष

  • कामाचे स्वरूप: कोरेल ड्रॉ, फोटोशॉप, मराठी-इंग्रजी टायपिंग, पुस्तके आणि जाहिरातींची मांडणी.
  • नोकरीच्या संधी: प्रिंटिंग प्रेसेस, वृत्तपत्र कार्यालये, फ्लेक्स प्रिंटिंग आणि जाहिरात एजन्सीजसाठी फोटोशॉप करून देणे.

टॉप ITI ट्रेड्सची तुलनात्मक तालिका

ITI ट्रेड (Trade Name)कालावधीपात्रतासरासरी महिना पगार (Fresher)मुख्य भरती क्षेत्र
Electrician२ वर्षे१०वी पास (Maths/Science)₹१८,००० – ₹२८,०००महावितरण, रेल्वे, सोलर कंपन्या
Fitter२ वर्षे१०वी पास (Maths/Science)₹१६,००० – ₹२५,०००ऑटोमोबाईल, रेल्वे वर्कशॉप्स, MIDC
Welder१ वर्ष१०वी पास / ८वी पास₹१५,००० – ₹२२,००० (परदेशात ₹५०k+)शिपयार्ड्स, गल्फ प्रोजेक्ट्स, फॅब्रिकेशन
MMV (Motor Vehicle)२ वर्षे१०वी पास (Science)₹१६,००० – ₹२६,०००सर्व्हिस सेंटर्स, ऑटोमोबाईल प्लांट्स
Machinist / Turner२ वर्षे१०वी पास (Maths/Science)₹१७,००० – ₹२५,०००CNC/VMC युनिट्स, टूल रूम्स
COPA१ वर्ष१०वी पास₹१२,००० – ₹१८,०००सरकारी कार्यालये, आयटी सपोर्ट, बँका

महाराष्ट्र ITI ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (DVET Admission Process)

महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी ITI मधील प्रवेश हे DVET Maharashtra च्या अधिकृत पोर्टलवरून केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने (CAP Rounds) राबवले जातात. ही प्रक्रिया सामान्यतः १०वीचा निकाल लागल्यानंतर (जून-जुलै) सुरू होते.

[स्टेप १: DVET पोर्टलवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे ] 
                 ⬇
[स्टेप २: फॉर्म व ॲप्लिकेशन फी भरणे]
                 ⬇
[स्टेप ३: कागदपत्रांची पडताळणी (E-Scrutiny / प्रत्यक्ष) करून घेणे ]
                 ⬇
[स्टेप ४: ऑप्शन फॉर्म भरणे (Trade & ITI College Preference)]
                 ⬇
[स्टेप ५: मेरिट लिस्ट जाहीर होणे व सीट वाटप (CAP Rounds)]
                 ⬇
[स्टेप ६: अलॉट झालेल्या ITI मध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करणे]

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (Documents Checklist):

  • १०वीचे मूळ गुणपत्रक (SSC Marksheet)
  • शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate – LC/TC)
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate – मागासवर्गीय प्रवर्गासाठी)
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity – उपलब्ध असल्यास)
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer – VJ/NT, OBC, SBC प्रवर्गासाठी चालू आर्थिक वर्षातील वैध)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • उत्पन्न दाखला (Income Certificate – शिष्यवृत्तीसाठी)
  • आधार कार्ड व पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स (विद्यार्थ्याच्या नावाचे खाते असणे गरजेचे)

ITI नंतर अप्रेंटिसशिप (Apprenticeship): नोकरीची खरी गुरुकिल्ली

ITI पूर्ण केल्यानंतर थेट नोकरीसाठी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा १ वर्षाची अप्रेंटिसशिप (Apprenticeship Training) करणे करिअरसाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरते.

  • पोर्टल: भारत सरकारच्या अधिकृत राष्ट्रीय अप्रेंटिसशिप पोर्टल (apprenticeshipindia.gov.in) वर नोंदणी करावी लागते.
  • स्टायपेंड (Stipend): अप्रेंटिसशिप दरम्यान उमेदवारांना दरमहा ₹८,००० ते ₹१२,००० मानधन मिळते.
  • NAC प्रमाणपत्र: अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर National Apprenticeship Certificate (NAC) मिळते.
  • फायदा:
    • भारतीय रेल्वेच्या गट-ड (Group D) आणि असिस्टंट लोको पायलट भरतीमध्ये रेल्वे अप्रेंटिस पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी २०% जागा राखीव असतात.
    • महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्यांना प्राधान्य गुण मिळतात.

ITI नंतर करिअरच्या कोणत्या संधी मिळतात? (Career Scope)

ITI पूर्ण झाल्यानंतर प्रामुख्याने तुमच्यासमोर ३ मोठे करिअर पर्याय उपलब्ध होतात :

[ ITI उत्तीर्ण ]

  • शासकीय व खाजगी नोकऱ्या
    • रेल्वे, महावितरण, MIDC, ISRO
  • उच्च शिक्षण(Polytechnic)
    • थेट दुसऱ्या वर्षात डिप्लोमा
  • स्वयंरोजगार (Self Employment)
    • इलेक्ट्रिकल,फॅब्रिकेशन,स्वतःचे गॅरेज

१. शासकीय नोकऱ्या (Government Jobs):

  • भारतीय रेल्वे: Assistant Loco Pilot (ALP), रेल्वे टेक्निशियन ग्रेड-३, ट्रॅक मेंटेनंट.
  • महावितरण (MSEDCL): विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक (Sub-station Assistant).
  • संरक्षण कारखाने व संशोधन संस्था: DRDO, ISRO, BARC, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि नेव्हल डॉकयार्ड्स.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC): मेकॅनिक आणि ऑटो-इलेक्ट्रिशियन.

खाजगी क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग हब्स:

महाराष्ट्रातील पुणे (चाकण, तळेगाव, भोसरी), नाशिक, छत्रपती संभाजीनगर (वालूज), कोल्हापूर (शिरोली, गोकुळ शिरगाव) आणि नागपूर या औद्योगिक क्षेत्रातील पट्ट्यांमध्ये ITI तंत्रज्ञांना त्वरित नोकऱ्या मिळतात.

२. थेट दुसऱ्या वर्षी इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश (Lateral Entry to Polytechnic):

ज्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असते, ते २ वर्षांचा ITI पूर्ण केल्यानंतर थेट पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात (Direct Second Year Diploma) प्रवेश घेतात आणि इंजिनीरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण करतात.

३. स्वयंरोजगार (Self Employment):

इलेक्ट्रिशियन स्वतःचे इलेक्ट्रिकल मटेरियलचे दुकान आणि वायरिंग कंत्राट सुरू करून स्वतःचा रोजगाराचा मार्ग काढतात; वेल्डर स्वतःचे फॅब्रिकेशन वर्कशॉप चालू करू शकतात; तर मोटर मेकॅनिक स्वतःचे गॅरेज किंवा सर्व्हिसिंग सेंटर सुरू करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात. यासाठी शासनाच्या मुद्रा लोन (Mudra Loan) योजनेचाही लाभ घेता येतो.

Government ITI vs Private ITI

ITI निवडताना हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना तो गोंधळात ही टाकतो.

मुद्दाGovernment ITIPrivate ITI
Feesअनेकदा तुलनेने कमी असू शकतेInstitute नुसार बदलते
InfrastructureInstitute नुसारInstitute नुसार
Tradesउपलब्धतेनुसारउपलब्धतेनुसार
AdmissionState process/RulesApplicable admission rules
Practical facilitiesInstitute नुसार तपासाInstitute नुसार तपासा
PlacementInstitute-specificInstitute-specific
Apprenticeship exposureउपलब्धतेनुसारउपलब्धतेनुसार

फक्त “Government” किंवा “Private” Label पाहून कोणत्याही संस्थेची निवड करणे अयोग्य आहे. Trade + Infrastructure + Faculty + Practical Training + Affiliation/Recognition + Placement/Apprenticeship record वरील सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेणे कधीही उपयुक्त ठरते.

ITI निवडताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

Admission घेण्याआधी तुम्ही हा विचार केलाच पाहिजे:

1. Trade उपलब्ध आहे का?

तुम्हाला हवा असलेला Trade प्रवेश घेणाऱ्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे का हे बघितले पाहिजे?

2. Affiliation/Recognition

Trade ची सध्याची मान्यता/संलग्नता स्थिती तपासणे उपयुक्त ठरते.

3. Workshop आणि Lab

Electrician हा ट्रेड घेत असाल तर विद्युतविषयक प्रात्यक्षिक सुविधा आहेत का? आणि Computer Trade घेत असाल तर Computer lab कशी आहे? हे चेक करणे गरजेचे आहे.

4. Faculty

कर्मचारी प्रशिक्षण आणि प्रशिक्षक बद्दल माहिती घ्या व तेथील प्रॅक्टिकल वर्क बद्दल ही माहिती घ्या.

5. Previous Results

गतवर्ष्यातील बॅचेस ची परीक्षेतील कामगिरी कशी आहे तपासा.

6. Apprenticeship Opportunities

ITI नंतर भविष्यात व्यावहारिक उद्योग क्षेत्र शोधण्यास मिळण्याची शक्यता किती आहे ते तपासा.

7. Travel/Hostel

दररोजचा प्रवास शक्य आहे का? Hostel उपलब्ध आहे का? हे प्रश्न विचारात घेऊन तुम्ही पुढचा निर्णय घेतला पाहिजे.

8. Fees

कोर्सेस फीस सोबत Travel, Tools, Uniform, Hostel आणि इतर खर्चही विचारात घेऊन पुढील निर्णय घेणे उपयुक्त ठरते.

ITI केल्यानंतर Job मिळतो का?

I.T.I केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न असतोच. उत्तर:

ITI केल्यामुळे Job ची नोकरीची पात्रता आणि तांत्रिक शिक्षणाचे धडे मिळून जातात; पण पण प्रत्येक विद्यार्थ्याला लगेच नोकरी मिळेल असे होत नाही. Job opportunities वर खालील गोष्टींचा परिणाम होतो:

  • Trade
  • Technical skills
  • Practical ability
  • Institute
  • Apprenticeship experience
  • Employer requirements
  • Location
  • Communication skills
  • Interview performance

म्हणून ITI चे शिक्षण पूर्ण करीत असताना फक्त Certificate मिळवणे हा एकमेव ध्येय ठेवू नका. Skill + Practice + Experience यावर परिपूर्ण लक्ष्य केंद्रित करा.

ITI नंतर Apprenticeship म्हणजे काय?

ITI नंतर Apprenticeship हा व्यावहारिक अनुभव मिळवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. Apprenticeship मध्ये प्रशिक्षणार्थीला कामाच्या ठिकाणचे वातावरणाचे व्यावहारिक प्रशिक्षण योग्य रितीने मिळून जाते.

DGT च्या प्रशिक्षणार्थी (ॲप्रेंटिसशिप) विषयक माहिती नुसार व्यावसायिक शिकाऊ उमेदवारसाठी प्रशिक्षण कालावधी प्रत्येक ट्रेंड नुसार बदलत असते आणि अनेक Designated trades उपलब्ध असतात. Training मध्ये मूलभूत प्रशिक्षण आणि व्यावहारिक प्रशिक्षण यांचे योग्य शिक्षण इथे घेतले जातात; विहित चाचणी पूर्ण केल्यावर National Apprenticeship Certificate (NAC) मिळून जातो.

सोप्या भाषेत समजावयाचे झाले तर:

ITI → Apprenticeship → Practical Experience → Job Opportunities हा एक योग्य आणि उपयुक्त पर्याय आहे.

ITI नंतर Diploma करता येतो का?

काही परिस्थितींमध्ये ITI विद्यार्थ्यांसाठी पुढील तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी चे Routes उपलब्ध असू शकतात. परंतु ITI trade, Qualifications, Admission category आणि त्या वर्षाच्या नियमानुसार Eligibility बदलू शकते.

म्हणून “ITI केल्यावर थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा मध्ये प्रवेश मिळून जातो” असा सार्वत्रिक नियम आहे असे समजून चालू नका. ज्या वर्षी admission घ्यायचे आहे त्या वर्षाची संबंधित Maharashtra technical education admission notification तपासून तुम्ही पुढील योग्य निर्णय घ्यावा.


ITI नंतर Government Job करता येते का?

हो नक्कीच, काही शासकीय आणि खाजगी क्षेत्रामधील ITI पात्रता-आधारित तांत्रिक पदासाठी उपयोगी किंवा पात्रता म्हणून नमूद केली जाते. पण प्रत्येक भरतीची:

  • Educational qualification
  • Trade requirement
  • Age limit
  • Exam pattern
  • Experience
  • Physical Requirements वेगवेगळी असतात.

म्हणून “ITI केल्यावर Government Job मिळतो” असे सर्वसाधारण वचन करणे योग्य आहे असा वाटत नाही. त्याऐवजी: ITI Trade → संबंधित recruitment eligibility → Exam/Selection → Job अशा मार्गाचा विचार करून पुढील निर्णय घेणे कधीही चांगले.


ITI Trade Selection Formula

ITI Trade निवडताना: Interest + Aptitude + Practical Skills + Local Job Opportunities + Further Education हे 5 Factors चा योग्य असा विचार करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

उदाहरण: तुम्हाला Computer आवडतो. फक्त “Computer field ला प्रचंड मागणी आहे” म्हणून COPA निवडण्यापेक्षा तुम्ही हे प्रश्न नक्की विचारा:

  • मला Computer वर रोज काम करायला आवडेल का?
  • Typing आणि Basic software शिकण्यात इंटरेस्ट आहे का?
  • Programming मध्ये Genuine Interest आहे का?
  • पुढे जाऊन भविष्यात Web development शिकण्याची इच्छा आहे का?

जर उत्तर हो असेल तर Computer-related ITI चा मार्ग अधिकच योग्य आणि अर्थपूर्ण बनून जातो.


ITI vs 11वी – कोणता मार्ग निवडावा?

10वी नंतर ITI आणि 11वी हे दोन्ही वेगवेगळी आणि विस्तृत मार्ग आहेत

FactorsITI11वी–12वी
Main FocusVocational/TechnicalAcademic
LearningPractical + TheorySubject-based
Career DirectionSpecific tradeScience/Commerce/Arts
DurationTrade नुसार 1–2 years2 years
EngineeringTechnical route possibleScience route
CommerceDirect route नाहीCommerce
ArtsDirect route नाहीArts
Practical SkillsStrong focusStream/course dependent
Further EducationTechnical routesDegree/Professional routes

Simple rule:

जर तुम्हाला विशिष्ट तांत्रिक कौशल्य लवकर शिकायची असेल → ITI विचारात घेणे जरुरीचे आहे. जर तुम्हाला Science/Commerce/Arts मधून पुढील Degree किंवा व्यावसायिक व उच्च शिक्षण घेणेचे असेल → 11वी–12वी चा मार्ग विचारात घेणे कधीही चांगले


ITI vs Diploma – फरक काय?

हा देखील एक विद्यार्थ्यांना पडणारा common प्रश्न आहे.

FactorsITIDiploma
Main focusTrade skillTechnical education
Durationसाधारण 1–2 yearsPost-SSC engineering diploma सामान्यतः 3 years
PracticalStrongStrong
Theoryतुलनेने trade-focusedअधिक technical academic content
ExamplesElectrician, Fitter, COPACivil, Mechanical, Electrical, Computer
CareerSkilled technician/trade rolesTechnician/technical roles + further education
Higher StudyEligibility-basedEngineering-related further study routes

सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच मार्ग सर्वोत्तम असेल असे नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचे ध्येय ठरवून करिअर चा योग्य आणि अचूक निर्णय घेणे अधिकच उपयुक्त ठरते.


ITI विद्यार्थ्यांसाठी English किती महत्त्वाचे आहे?

आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षण एवढे मूलभूत संवाद कौशल्ये वर देखील तितकेच लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण तुम्हाला:

  • Interview द्यावा लागतो.
  • Supervisor शी संवाद साधावा लागतो
  • Work instructions समजून घ्यावे लागतात
  • Safety instructions वाचावे लागते.
  • काही तांत्रिक नियमावली इंग्रजी मध्येच असतात ते समजून घ्यावे लागतात

म्हणून रोज थोडे-थोडे: English + Computer + Communication. यावर काम करणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू लागते.


ITI नंतर स्वतःचा Business सुरू करता येतो का?

हो, काही Trades मध्ये योग्य अनुभव मिळाल्यानंतर तुम्ही स्वयंरोजगारचा नक्कीच विचार करू शकता. उदाहरण:

Electrician

Electrical service work तुम्ही सुरु करू शकता.

Welder

Fabrication work चे सर्व कामे तुम्ही स्वतः घेऊ शकता

Automobile

Vehicle Repairing/service तुम्ही सुरु करू शकता.

Computer

Computer service/digital support ची सर्व कामे तुम्हाला करता येतात.

Plumber

Plumbing services ची सर्व कामे तुम्ही सुरु करू शकता.

पण स्वतःचा Business सुरू करण्यापूर्वी तुम्ही खालील गोष्टींचा विचार जरूर करावा.:

  • Practical experience
  • Tools
  • Capital
  • Local demand
  • Registration/licensing requirements
  • Safety rules या सर्व बाबींचा विचार करून पुढील योग्य निर्णय घेणे खूपच चांगले.

ITI करताना विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात?

1. फक्त “लवकर Job मिळते” म्हणून ITI निवडणे

ITI हा काही Shortcut नाही. Technical skill develop करण्यासाठी तुम्हाला सततचा सराव करावा लागतो.

2. Trade न समजता प्रवेश निश्चित करणे

Electrician, Fitter, COPA आणि Automobile यांची पूर्ण कामाची माहिती घेऊन प्रवेश निश्चित करावा..

3. Institute research न करणे

फक्त जवळचे ITI म्हणून प्रवेश घेण्याचा निर्णय चुकीचा ठरू शकतो.

4. Practical training ला कमी महत्त्व देणे

ITI मध्ये व्यावहारिक कौशल्य शिकणे हा प्रमुख भाग आहे, त्यामुळे त्याला कानाडोळा करणे चुकीचे आहे.

5. Apprenticeship ignore करणे

योग्य व अचूक उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

6. Additional skills न शिकणे

Certificate सोबत Skills stack वाढवणे खूप गरजेचे आहे.

7. Government Job guaranteed आहे असे समजणे

सरकारी पदासाठी Recruitment-specific eligibility आणि Selection process असतो.


Parents साठी ITI बद्दल महत्त्वाची माहिती

या प्रगत काळातही काही पालक अजूनही ITI ला “फक्त कमी Marks असलेल्या विद्यार्थ्यांसाठी” मार्ग आहे असे अजून पण समजतात. हा दृष्टिकोन बाळगणे पूर्णपणे चुकीचे आहे. ITI हा व्यावसायिक कौशल्य शिक्षणाचा स्वतंत्र मार्ग आहे. जर तुमच्या पाल्याला:

  • Electrical
  • Mechanical
  • Automobile
  • Electronics
  • Computer
  • Manufacturing

यांसारख्या तांत्रिक क्षेत्रामध्ये खरच आवड असेल तर ITI हा त्याच्यासाठी व्यावहारिक करिअर मार्ग आहे. पालकांनी मुलाला फक्त मिळालेल्या गुणांच्या आधारावर ITI किंवा 11वीकडे ढकलण्याऐवजी त्याचा Genuine Iinterest + aptitude + career goal समजून घेणे खूप गरजेचे आहे.


Career Decision Worksheet – ITI घ्यायचा का?

प्रश्न(Questions)उत्तर
मला practical work आवडतो का?स्वतःचे उत्तर
मला technical field आवडते का?स्वतःचे उत्तर
माझा strongest subject कोणता?स्वतःचे उत्तर
मला machines मध्ये interest आहे का?स्वतःचे उत्तर
मला computer मध्ये interest आहे का?स्वतःचे उत्तर
मला electrical work आवडते का?स्वतःचे उत्तर
मला automobile field आवडतो का?स्वतःचे उत्तर
माझा preferred ITI Tradeस्वतःचे उत्तर
माझे preferred ITIस्वतःचे उत्तर
माझा Backup Tradeस्वतःचे उत्तर
ITI नंतर माझे Goalस्वतःचे उत्तर
Apprenticeship करणार का?स्वतःचे उत्तर
पुढे Diploma/Other Education करणार का?स्वतःचे उत्तर

ही Worksheet भरताना तुमचे उत्तर हे प्रामाणिक आणि विचारपूर्वक असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही स्वतःसाठी योग्य व अचूक निर्णय घेऊ शकता.

अंतिम निष्कर्ष

“कोणत्याही पदवीच्या कागदापेक्षा हातातील प्रत्यक्ष कौशल्याची ताकद ही माणसाला कधीही उपाशी पोटी झोपू देत नाही!”

१०वीनंतर उच्च शिक्षणाचा अवाजवी आर्थिक खर्च पेलणे शक्य नसेल, किंवा पुस्तकी घोकंपट्टीच्या चक्रव्यूहात स्वतःची वर्षे वाया घालवायची नसतील, तर स्वतःला अजिबात कमी लेखू नका.

आयटीआय हा कोणताही दुय्यम दर्जाचा मार्ग नसून, तो स्वावलंबन, तांत्रिक प्रतिष्ठा आणि खात्रीशीर सरकारी-खाजगी रोजगाराचा सर्वात वेगवान महामार्ग आहे.

  • स्वतःचा कल ओळखा (वीज, मशिन, वाहने की कॉम्प्युटर).
  • DVET च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत वेळेत फॉर्म भरा.
  • NCVT संलग्नित शासकीय आयटीआयला पहिली पसंती द्या.
  • आणि पुढील दोन वर्षे वर्कशॉपमध्ये प्रामाणिकपणे घाम गाळून कामावर हुकूम मिळवा.

जेव्हा वयाच्या विसाव्या वर्षी तुमच्या हातामध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) आणि अप्रेंटिसशिपचा अनुभव असेल, तेव्हा समवयस्क मुले केवळ कॉलेजच्या वर्गात नोट्स काढत असतील आणि तुम्ही स्वतःच्या हिमतीवर कुटुंबाला पहिला पगार आणून देत असाल!

महाराष्ट्रातील सर्व ITI प्रवेश प्रक्रिया (DVET CAP Rounds), शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) जाहिराती, रेल्वे व महावितरण भरती आणि करिअर गाईडन्सच्या अधिकृत माहितीसाठी maharozgar.in ला नियमित भेट देत राहा!

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा:

“ITI हा कमी marks असलेल्या विद्यार्थ्यांसाठीचा पर्याय नाही; तो Practical technical skills शिकण्याचा स्वतंत्र career route आहे.”

महाराष्ट्रातील सर्व शासकीय ITI ॲडमिशन अपडेट्स, रेल्वे व महावितरणच्या ताज्या भरती, हॉल तिकिट्स आणि निकालांच्या अधिकृत माहितीसाठी maharozgar.in ला दररोज भेट देत राहा!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न १: ITI नंतर १२वी समकक्ष (12th Equivalent) प्रमाणपत्र मिळते का?

उत्तर: होय! महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, १०वीनंतर २ वर्षांचा ITI पूर्ण करून राज्य मंडळाची इंग्रजी आणि मराठी अशा दोन विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवाराला १२वी समकक्ष प्रमाणपत्र दिले जाते. याच्या आधारे पुढे थेट पदवी (B.A., B.Com) शिक्षणासाठी अर्ज करता येतो.

प्रश्न २: खाजगी ITI पेक्षा शासकीय ITI (Government ITI) का चांगली मानली जाते?

उत्तर: शासकीय ITI ची वार्षिक फी अत्यंत नाममात्र (सुमारे ₹१,००० ते ₹२,०००) असते आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीही माफ असते. याव्यतिरिक्त शासकीय ITI मधील वर्कशॉप्स, अद्ययावत मशिन्स आणि अनुभवी निदेशक (Instructors) उत्तम असतात. तसेच नामांकित कंपन्या थेट कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सरकारी ITI ला प्रथम प्राधान्य देतात.

प्रश्न ३: १०वीत कमी टक्के (५०% ते ६०%) असल्यास चांगला ITI ट्रेड मिळतो का?

उत्तर: नक्कीच! शासकीय ITI मधील काही प्रसिद्ध ट्रेड्सचा कट-ऑफ जास्त असला, तरी अनेक ट्रेड्समध्ये आणि दुसऱ्या-तिसऱ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये ६०% गुणांवरही सहज प्रवेश मिळतो. ग्रामीण भागातील शासकीय ITI किंवा खाजगी ITI मध्ये सहज प्रवेश मिळू शकतो.

प्रश्न ४: ITI केल्यानंतर परदेशात (Gulf Countries) नोकरीच्या संधी आहेत का?

उत्तर: होय, प्रचंड संधी आहेत! विशेषतः वेल्डर (TIG/MIG Welder), प्लंबर, फिटर आणि इलेक्ट्रिशियन यांना दुबई, सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि जर्मनी या देशांमध्ये मोठी मागणी आहे. तेथे अशा कुशल तंत्रज्ञांना दरमहा ₹६०,००० ते ₹१,५०,००० पर्यंत पगार मिळतो.

प्रश्न 5: ITI साठी कोणता trade सर्वोत्तम आहे?

सर्वांसाठी एकच trade सर्वोत्तम नसतो. तुमची आवड, शैक्षणिक पात्रता, practical aptitude, उपलब्ध training आणि career goals यानुसार trade निवडा.

IMPORTANT LINKS

About Maharozgar...

Maharozgar.in हे Maharashtra मधील Government Jobs, Private Jobs, Career Guidance आणि Exam Preparation संबंधित माहिती देणारे online platform आहे.

Quick Links

Get Latest Job Alerts

Maharashtra Government आणि Private Jobs चे latest updates मिळवण्यासाठी join करा.