12वी Arts नंतर काय करावे? कोर्सेस, करिअर पर्याय, प्रवेश परीक्षा आणि नोकऱ्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) १२वीचा निकाल जाहीर झाला की कला शाखेच्या (Arts / Humanities) विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न आवर्जून उभा राहतो — “१२वी आर्ट्स नंतर नक्की काय करावे? आर्ट्समधून शिकून खरोखरच उच्च पगाराच्या आणि प्रतिष्ठित नोकऱ्या मिळतात का?”

अनेक वर्षांपासून समाजात असा एक गैरसमज पसरवला गेला आहे की आर्ट्स म्हणजे केवळ “कमी गुण मिळालेल्यांचा पर्याय” किंवा फक्त साध्या पदवीपुरते मर्यादित शिक्षण. मात्र आज २०२६ च्या वास्तवात ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
आज देशातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी (IAS/IPS), हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे नामांकित कॉर्पोरेट वकील, आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी, मीडिया संचालक, UI/UX डिझायनर्स, सायकॉलॉजिस्ट आणि धोरणकर्ते (Policy Makers) हे सर्व आर्ट्स आणि ह्युमॅनिटीजच्या भक्कम पायावर उभे आहेत.
या परिपूर्ण मार्गदर्शकामध्ये आपण ५ वर्षांची विधी शाखा (Law), नागरी सेवा (MPSC/UPSC) पूर्वतयारी, जनसंवाद व पत्रकारिता (BAMMC), डिझायनिंग, मानसशास्त्र, CET प्रवेश परीक्षा आणि १२वीनंतर थेट मिळणाऱ्या सरकारी नोकऱ्या याबद्दल सविस्तर माहिती सोप्या मराठी-इंग्रजी भाषेत जाणून घेणार आहोत.
Quick Decision Matrix: १२वी आर्ट्सनंतरचे प्रमुख करिअर मार्ग
| करिअर क्षेत्र (Fields) | प्रमुख अभ्यासक्रम (Degrees) | प्रवेश पद्धत / परीक्षा | कालावधी | प्रमुख कार्यक्षेत्र व पदे |
| विधी शाखा (Law) | B.A. LLB, BBA LLB | MH-CET Law (5 Years), CLAT | ५ वर्षे | कॉर्पोरेट वकील, दिवाणी न्यायाधीश (JMFC), लीगल ॲडव्हायझर |
| नागरी सेवा व प्रशासन | B.A. (History, Pol Sci, Economics) | थेट कॉलेज मेरिट | ३ वर्षे | IAS, IPS, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी |
| मास मीडिया व पत्रकारिता | BAMMC, B.A. Journalism | विद्यापीठ मेरिट / CET | ३ वर्षे | न्यूज अँकर, डिजिटल कंटेंट हेड, PR ऑफिसर, सोशल मीडिया हेड |
| डिझाईन व ललित कला | B.Des, BFA, Interior / Fashion | NID DAT, NIFT, UCEED | ४ वर्षे | UI/UX डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर, आर्ट डायरेक्टर |
| हॉस्पिटॅलिटी व मॅनेजमेंट | BHM, BBA (Travel & Tourism) | MAH-B.HMCT CET, BBA CET | ३ ते ४ वर्षे | हॉटेल जनरल मॅनेजर, इव्हेंट डायरेक्टर, एव्हिएशन मॅनेजर |
| थेट सरकारी नोकऱ्या | महाराष्ट्र पोलीस, SSC CHSL, सैन्यदल | लेखी परीक्षा + शारीरिक चाचणी | थेट नियुक्ती | पोलीस शिपाई, केंद्रीय मंत्रालय लिपिक, पोस्टल असिस्टंट |
म्हणून Career निवडताना “Arts ला Scope आहे का?” हा प्रश्न विचारण्यापेक्षा “माझ्या Interest आणि Strength नुसार Arts मधून माझ्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे?” हा प्रश्न विचारणे जास्त उपयोगी ठरते.
- Maharozgar.in Career Promise: या Guide मध्ये कोणत्याही Course ला “Best” किंवा “Highest Salary” असा Tag दिला जाणार नाही तर प्रत्येक Career चा अभ्यासाचा मार्ग, Skills आणि पुढील Opportunities तुम्ही समजून घेऊन निर्णय घेता यावा हाच उद्देश आहे
सर्वात आधी तुमचा Arts मधील Interest ओळखा
Arts हा एकच Subject नाही. तुम्ही History, Geography, Political Science, Economics, Sociology, Psychology, Marathi, English आणि इतर Subjects तुम्ही शिकलेले असता.
यातील कोणत्या क्षेत्रात तुम्हाला naturally Interest वाटतो हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.
1. History आवडत असेल तर…
जर तुम्हाला इतिहासातील घटना, समाजातील बदल, राजकीय घडामोडी आणि वेगवेगळ्या कालखंडांबद्दल वाचायला आवडत असेल तर History-related Degree हा पर्याय तुमच्यासाठी असू शकतो.
पुढील दिशांचा विचार तुम्ही करू शकता:
- BA History
- Competitive Exam Preparation
- Teaching
- Research
- Museum आणि Heritage-related Work
- Journalism आणि Content
History हा फक्त पाठांतराचा Subject आहे असा समज तुम्हाला ठेऊन चालणार नाही. Research, Writing आणि Analysis Skills विकसित केल्यास त्याचा उपयोग इतर Career Directions मध्येही होतो.
2. Political Science आवडत असेल तर…
Political Science तुम्हाला मध्ये Government, Constitution, Politics, Public Policy आणि Political Institutions यांचा अभ्रासक्रम तुम्हाला शिकवला जातो.
Possible Career Pathways:
- BA Political Science
- Civil Services Preparation
- Government Exams
- Public Policy
- Journalism
- Research
- Teaching
UPSC किंवा MPSC करण्याचा विचार असलेल्या विद्यार्थ्यांना Political Science सारखे Subjects अभ्यासात उपयोगी आहेत ; मात्र कोणताही एक Degree Subject Civil Services साठी अनिवार्य आहे असा नियम नाही.
3. Geography आवडत असेल तर…
Maps, Environment, Population, Agriculture, Climate आणि स्थानिक भूगोल यामध्ये तुम्हाला Genuine Interest असेल तर Geography हा तुमच्यासाठी एक चांगला Academic Direction ठरू शकतो.
Career Directions
- BA Geography
- Teaching
- GIS-related Skills
- Environment-related Work
- Competitive Exams
- Research
आज Geography सोबत GIS आणि Digital Mapping Skills शिकण्याचाही पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
4. Economics आवडत असेल तर…
Numbers पूर्णपणे आवडत नसले तरी Economics मध्ये Business, Markets, Government Policies आणि Economy यांचा अभ्यासक्रम तुम्हाला इथे शिकवले जाते.
Career Directions
- BA Economics
- Banking
- Finance-related Roles
- Data आणि Analytics
- Government Sector
- Research
- Higher Studies
जर तुम्हाला Economics सोबत Mathematics आणि Statistics आवडत असतील तर पुढे Analytics-oriented Learning देखील करता येते.
5. Psychology मध्ये Interest असेल तर…
आज अनेक विद्यार्थ्यांना Human Behavior, Mind, Personality आणि Mental Processes याबद्दल शिकण्यात खूप Interest असतो. जर तुम्हाला लोकांचे Behavior समजून घेणे, ऐकणे आणि Psychology विषय वाचणे,शिकणे आवडत असेल तर Psychology-related शिक्षण घेणे एक उत्तम पर्याय ठरतो.
Possible Path
12वी Arts ↓ BA Psychology / संबंधित Degree ↓ Higher Studies ↓ Specialization / Career
Psychology मध्ये पुढील Professional Roles साठी अनेकदा Higher Education आणि specific qualifications आवश्यक असतात. त्यामुळे फक्त Degree आणि Professional Practice यामधील फरक समजून घेणे तुमच्यासाठी उपयोगी आहे.
6. Marathi किंवा English Language आवडत असेल तर…
जर तुम्हाला Writing, Reading, Storytelling किंवा Communication आवडत असेल तर Language-based Careers चा विचार तुमच्यासाठी उत्तम आहे.
Possible Options
- BA Marathi
- BA English
- Journalism
- Content Writing
- Copywriting
- Publishing
- Teaching
- Translation
- Digital Content आज Websites, YouTube, Social Media आणि Digital Publishing मुळे Writing Skills चा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो.
7. Sociology मध्ये Interest असेल तर…
Sociology मध्ये Society, Social Groups, Culture, Social Change आणि Human Relationships याबद्दल तुम्हाला इथे शिकवले जाते.
Career Directions
- BA Sociology
- Social Research
- Social Work
- NGO Sector
- Government Sector
- Teaching
- Competitive Exams
8. Public Administration मध्ये Interest असेल तर…
Government Administration कसं काम करतं, Public Services कशा चालवले जातात आणि Policies कशा Implement केल्या जातात यामध्ये Genuine Interest असेल तर Public Administration हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे.
Possibly Areas
- Government Exams
- Public Policy
- Administration
- Research
- Teaching
- Civil Services Preparation
12वी Arts नंतर निर्णय घेण्यापूर्वी 7 प्रश्न स्वतःला विचारा
Career Decision घेताना हे Questions कागदावर लिहून तुम्ही याचा विचार करू शकता.
Question 1 – मला कोणता Subject खरंच आवडतो?
खालील Table स्वतः भरून याचे परीक्षण करा.
| Subject | Interest Level |
|---|---|
| History | ⭐ ⭐ ⭐ |
| Geography | ⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ |
| Political Science | ⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ |
| Economics | ⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ |
| Psychology | ⭐ ⭐ ⭐ ⭐ |
| Marathi | ⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ |
| English | ⭐ ⭐ ⭐ |
| Sociology | ⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ |
तुमच्या आवडीनुसार तुम्ही उत्तर देणे बंधनकारक आहात.
Question 2 – मला Government Job करायची आहे का?
जर तुमचं Long-Term Goal Government Career करण्यात असेल तर Graduation सोबत तुम्ही Competitive Exam Preparation सुरु करू शकता.
Broad Career Paths:
- UPSC
- MPSC
- SSC
- Banking
- Police Recruitment
- Railway Recruitment
- Other Government Recruitment
पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा:
Government Job हा एक Career Goal आहे; तो फक्त Arts विद्यार्थ्यांसाठीच आहे असं नाही.
Question 3 – तुम्हाला Law मध्ये Interest असेल?
- Constitution
- Law
- Court Cases
- Argument
- Reading
- Legal Documents
Genuine Interest असेल तर Law करून तुम्ही तुमचे करिअर यामध्ये बनवू शकता.
12वी नंतर 5-year integrated law programmes हा एक मार्ग असू शकतो. महाराष्ट्रातील Law admissions साठी State CET Cell संबंधित entrance/admission process चालवते; 2026-27 साठी 5-year आणि 3-year LL.B. CAP संबंधी अधिकृत notices उपलब्ध आहेत.
Question 4 – मला People-oriented Career आवडतो का?
जर तुम्हाला लोकांशी बोलणे, त्यांच्या Problems समजून घेणे आणि एकमेकांसोबत बातचीत करणे आवडत असेल तर खालील Areas मध्ये तुम्ही जाऊ शकता:
| Interest | Possible Directions |
|---|---|
| People + Behaviour | Psychology |
| People + Society | Social Work |
| People + Communication | Journalism / PR |
| People + Teaching | Education |
| People + Business | Marketing / Sales |
Question 5 – तुम्हाला Writing आणि Media आवडतात का?
- Writing
- News
- Video
- Photography
- Social Media
- Storytelling
यामध्ये Genuine Interest असेल तर Journalism आणि Digital Media संबंधित Courses तुमच्यासाठी आहेत.
Career Paths
- Journalism
- Content Writing
- Digital Media
- Public Relations
- Social Media
- Content Creation
Question 6 – मला Creative Career हवा आहे का?
Arts विद्यार्थ्यांसाठी Creative Field हा देखील एक उत्तम करिअर साबीत होतोय.
Examples
- Graphic Design
- Photography
- Video Editing
- Animation
- Fashion
- Interior Design
- Content Creation
पण Creative Career मध्ये तुम्ही Portfolio आणि Practical Skills कडे बारीकीने लक्ष केंद्रित केले पाहिजे. फक्त Certificate मिळवणे पुरेसे नसते.
Question 7 – मला Degree सोबत Skill शिकायची आहे का?
आजच्या Career Planning मध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हे काही स्किल्स आहेत जे तुम्ही कॉलेज बरोबरच तुम्ही शिकणे गरजेचे आहे.
उदाहरण:
| Degree | Additional Skills |
|---|---|
| BA English | Content Writing + SEO |
| BA Economics | Excel + Data Analysis |
| BA Psychology | Research + Communication |
| BA Political Science | Writing + Current Affairs |
| BA Geography | GIS Basics |
| BA Any Subject | Digital Marketing + MS Office |
यामुळे Degree आणि Practical Skill यांच्यात एक Broad Connection तयार होतो.
Basic Arts Career Formula – 2026
| Step | What to Do |
|---|---|
| Step 1 | Favourite Subject ओळखा |
| Step 2 | Career Interest लिहा |
| Step 3 | Top 3 Career Options निवडा |
| Step 4 | Course Eligibility तपासा |
| Step 5 | College Options Compare करा |
| Step 6 | Skill Course निवडा |
| Step 7 | Long-Term Goal ठरवा |
12वी Arts नंतर Career Categories – Quick Overview
नागरी सेवा आणि स्पर्धा परीक्षांचा भक्कम पाया (Civil Services – UPSC & MPSC)
महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी १२वी आर्ट्सची निवड प्रामुख्याने प्रशासकीय अधिकारी (IAS, IPS, उपजिल्हाधिकारी, DSP, तहसीलदार) बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून करत असतात.
आर्ट्स शाखेचा स्पर्धा परीक्षांमध्ये काय फायदा होतो?
- अभ्यासक्रमाची समानता: UPSC आणि MPSC च्या पूर्व (Prelims) आणि मुख्य (Mains) परीक्षेतील ६०% ते ७०% अभ्यासक्रम हा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना (Polity), अर्थशास्त्र (Economy) आणि समाजशास्त्र या विषयांवर आधारित असतो. हेच सर्व विषय आर्ट्सच्या अभ्यासक्रमात शिकलेले असतात.
- वेळेचे उत्तम नियोजन: इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना रोज ८-१० तास लॅब किंवा प्रॅक्टिकल्सचा ताण नसतो. त्यामुळे कॉलेजचे लेक्चर्स सांभाळून रोज ६ ते ७ तास स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास त्यांच्याकडून सहज होतो.
- योग्य पदवी संयोजन (Subject Combination): B.A. करताना राज्यशास्त्र + इतिहास + अर्थशास्त्र किंवा भूगोल हे विषय निवडल्यास स्पर्धा परीक्षेचा पाया पदवीच्या काळातच १००% पक्का होतो.
५ वर्षांचा एकात्मिक विधी अभ्यासक्रम (Integrated B.A. LLB)
विद्यार्थ्याने पदवीनंतर ३ वर्षांचे LLB करण्याऐवजी १२वीनंतर थेट ५ वर्षांचा B.A. LLB केल्यास विद्यार्थ्यांचे एक मौल्यवान वर्ष वाचते.
- प्रवेश परीक्षा:
- MH-CET Law (5 Years): महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलद्वारे (State CET Cell) ही परीक्षा घेतली जाते. यातून मुंबईचे Government Law College (GLC) आणि पुण्याचे ILS Law College यांसारख्या आशियातील अव्वल संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.
- CLAT (Common Law Admission Test): देशातील २४ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमध्ये (National Law Universities – NLUs) प्रवेशासाठी.
- करिअर वाटा व संधी:
- कॉर्पोरेट लॉ (Corporate Lawyer): मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या, Banks आणि IT फर्म्सचे करार, विलीनीकरण (M&A) आणि लीगल ऑडिट सांभाळणे. सुरुवातीचे वार्षिक पॅकेज ₹८ लाख ते ₹१८ लाख पर्यंत असू शकते.
- दिवाणी न्यायाधीश (JMFC – Judicial Magistrate First Class): पदवी पूर्ण होताच MPSC मार्फत घेतली जाणारी परीक्षा देऊन वयाच्या २५-२६ व्या वर्षी थेट न्यायाधीश बनण्याची संधी तुमच्याकडे असते.
- सायबर लॉ व आयपीआर (Intellectual Property Rights): कॉपीराइट, पेटंट आणि डिजिटल सायबर गुन्ह्यांशी संबंधित आधुनिक कायदेतज्ज्ञ म्हणून तुम्हाला करिअर करता येते..
- स्वतंत्र वकिली (Litigation): जिल्हा सत्र न्यायालय, High Court आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र प्रॅक्टिस तुम्हाला करता येते..
मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि भाषाशास्त्र (Psychology, Social Work & Languages)
आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव आणि सामाजिक बदलांमुळे या क्षेत्रांतील तज्ज्ञांना मोठी मागणी आहे:
- क्लिनिकल व कॉर्पोरेट सायकॉलॉजी (B.A. Psychology):
- मानसिक समुपदेशक (Counselor), बाल मानसशास्त्रज्ञ, Hospitals आणि मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये ‘Employee Wellbeing Specialist’.
- समाजकार्य पदवी (BSW – Bachelor of Social Work):
- CSR (Corporate Social Responsibility) विभागांमध्ये, आंतरराष्ट्रीय संस्था (UN, UNICEF, NGOs) आणि शासकीय समाजकल्याण प्रकल्पांमध्ये क्लास-१ पदावरती तुमची नियुक्ती होते.
- परकीय भाषा तज्ज्ञ (Foreign Language Expert):
- जर्मन, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश किंवा मँडेरिन (चिनी) भाषा तुम्ही शिकल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये दुभाषी (Translator / Interpreter) म्हणून दरमहा लाखो रुपयांचे पॅकेज तुम्ही मिळवू शकता.
जनसंवाद, मीडिया आणि डिजिटल कंटेंट (Mass Media & BAMMC)
आजचे युग हे सध्यस्थितीत माहिती आणि डिजिटल माध्यमांचे युग आहे. वृत्तवाहिन्या, युट्यूब चॅनेल्स, डिजिटल न्यूज पोर्टल्स, पॉडकास्ट्स आणि जनसंपर्क (PR) एजन्सीजचा झपाट्याने वाढ झालेली आहे.
- प्रमुख पदवी: BAMMC (Bachelor of Arts in Multimedia and Mass Communication) – कालावधी: ३ वर्षे.
- प्रमुख स्पेशलायझेशन्स:
- पत्रकारिता (Journalism): T.V Reporting, इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारिता, वृत्तसंपादक, राजकीय विश्लेषक.
- जाहिरात व जनसंपर्क (Advertising & Public Relations): कॉर्पोरेट ब्रँड्सची इमेज सांभाळणे, ॲड फिल्म मेकिंग, मीडिया प्लॅनिंग, Public Relations.
- डिजिटल कंटेंट क्रिएशन व सोशल मीडिया मॅनेजमेंट: मोठ्या कंपन्या आणि सेलिब्रेटींचे सोशल मीडिया हँडल्स, स्क्रिप्ट रायटिंग आणि व्हिडिओ प्रोडक्शन सांभाळणे.
डिझायनिंग, ललित कला आणि व्हिज्युअल आर्ट्स (Design & Creative Careers)
सर्जनशीलता (Creativity) आणि कल्पकतेची आवड असणाऱ्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी डिझायनिंग हे सर्वाधिक मानधन देणारे आधुनिक क्षेत्र बनले आहे:
[ १२वी आर्ट्स उत्तीर्ण ]
|
+--------------------------------+--------------------------------+
| | |
[ १. प्रॉडक्ट व फॅशन डिझाईन ] [ २. डिजिटल UI/UX डिझाईन ] [ ३. ललित कला व कमर्शियल आर्ट ]
(NID / NIFT द्वारे B.Des) (ॲप्स व सॉफ्टवेअर लेआउट्स) (सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट - BFA)
- B.Des (Bachelor of Design – ४ वर्षे):
- प्रवेश परीक्षा: NID DAT (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन), NIFT (फॅशन टेक्नॉलॉजी), किंवा UCEED (IIT बॉम्बे).
- शाखा: Industrial Design, Interior Design, Fashion Communication, Textile Design, Fashion Design.
- UI/UX डिझायनिंग (User Interface / User Experience):
- आजच्या सर्व मोबाईल ॲप्स (उदा. झोमॅटो, फोनपे, गुगल) आणि वेबसाइट्सचे व्हिज्युअल लेआउट डिझाईन करण्याचे काम आर्ट्स/डिझाईन बॅकग्राउंडचे लोक करतात. IT कंपन्यांमध्ये UI/UX डिझायनर्सना सॉफ्टवेअर इंजिनिअरपेक्षाही अधिक पगार मिळतो.
- BFA (Bachelor of Fine Arts – ४ वर्षे):
- संस्था: मुंबईचे जगप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (Sir J.J. School of Art).
- करिअर: Artists, कमर्शियल आर्ट, ॲनिमेशन, VFX, आर्ट डायरेक्टर, इलस्ट्रेटर आणि स्वतंत्र पेंटर.
१२वी आर्ट्सनंतर थेट सरकारी नोकऱ्या मिळवण्याची संधी(Direct Govt Jobs After 12th)
पदवीचे शिक्षण घेण्यापूर्वी किंवा शिकत असतानाच सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी खालील संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता:
- महाराष्ट्र पोलीस भरती (Police Constable, Driver & SRPF):
- १२वी उत्तीर्णतेवर शारीरिक चाचणी (५० गुण) आणि लेखी परीक्षा (१०० गुण) आधारे पोलीस शिपाई भरतीची प्रकिया असते..
- Staff Selection Commission (SSC CHSL):
- केंद्रीय मंत्रालयांमध्ये Lower Division Clerk (LDC), Junior Secretariat Assistant (JSA) आणि Data Entry Operator (DEO) या पदांचे तिथे भरती निघते. (मराठीसह प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा उपलब्ध).
- भारतीय सैन्यदल (Indian Army Agniveer – General Duty & Clerk):
- १२वी आर्ट्स उत्तीर्ण विद्यार्थी भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी पूर्णपणे पात्र असतात.
- भारतीय रेल्वे (RRB NTPC Under-Graduate Posts):
- तिकीट क्लार्क, ज्युनियर अकाउंट्स क्लार्क आणि कमर्शियल कम तिकीट कलेक्टर (CC/TC).
- जिल्हा न्यायालये भरती (District Courts):
- कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) आणि लघुलेखक (Stenographer) या पदांचे तिथे भरती निघते. (मराठी/इंग्रजी टायपिंग अनिवार्य).
Maharashtra Admission Overview – 12वी Arts नंतर
12वी Arts नंतर प्रत्येक Course ची Admission ची Process ही सारखी नसते. काही Courses साठी University/College level admission असते, तर काही professional programmes साठी Maharashtra CET Cell ची प्रक्रिया लागू होते.
Maharashtra State CET Cell 2026-27 साठी विविध professional courses आणि centralized admission processes संदर्भातील official information प्रकाशित करत आहे. त्यात Law सारख्या courses च्या CAP notices देखील आहेत.
General Admission Flow
12वी चा निकाल ↓ Career + Course Shortlist ↓ Eligibility Check ↓ Entrance Exam (जर लागू असेल) ↓ Online Registration ↓ Merit / CAP / Counselling ↓ College Preference ↓ Seat Allotment / Admission
Arts Students साठी Basic Admission Documents
Admission season सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्याने जवळील सर्व Documents व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.
| Documents | Purpose |
|---|---|
| 12वी Marksheet | Academic Qualification |
| 10वी Marksheet | Academic Record |
| Leaving Certificate | College Admission |
| Aadhaar Card | Identity |
| Passport Size Photos | Application |
| Domicile Certificate | Applicable Admission Rules |
| Caste Certificate | Applicable Category |
| Income Certificate | Scholarship / Fee Benefits, where applicable |
12वी Arts विद्यार्थ्यांच्या Common Mistakes
1. “Arts घेतले म्हणजे Government Jobच करावी लागते.”
हा एक जुन्याकाळचा आणि चुकीचा समज आहे. Arts मधून Law, Psychology, Journalism, Management, Digital Careers, Teaching, Research असे अनेक प्रकारचे करिअर तुम्हाला करता येते.
2. Friends मागोमाग BA घेणे
मित्र ज्या College मध्ये प्रवेश घेईल तेच College तुमच्यासाठी योग्य असेल असं नाही.
3. BA म्हणजे Career संपलं असं समजणे
BA हा Graduation Level चा पाया आहे. त्यासोबत Skills, Internship, Competitive Exam Preparation किंवा Higher Education यापैकी एक तुम्ही केलात तर करिअर चे भरपूर मार्ग तुम्ही खोलू शकता.
4. UPSC/MPSC बद्दल फक्त ऐकून तयारी सुरू करणे
Civil Services हा तुमची Long-Term Preparation मागणारा मार्ग आहे. त्यामुळे Exam Pattern, Eligibility, Syllabus आणि Personal Study Capacity समजून घेतल्यानंतरच Planning करणे तुमच्यासाठी उत्तम ठरते.
5. Psychology म्हणजे लगेच Counsellor होता येतं असा समज
Psychology-related career मध्ये Education, specialization आणि professional requirements role तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
6. Degree सोबत कोणतीही Skill न शिकणे
Basic Computer, Excel, Communication, Writing किंवा Digital Skills अनेक Advanced Skills तुम्हाला भविष्यात उपयोगी पडतात.
7. College निवडताना फक्त Building पाहणे
College निवडताना तुमची ही प्राथमिकता पाहिजे:
- University Affiliation
- Course
- Faculty
- Library
- Computer Facilities
- Internship
- Fees
- Location
8. Career Planning शेवटच्या वर्षापर्यंत पुढे ढकलणे
Career Planning म्हणजे पहिल्याच दिवशी Final Career ठरवणे नाही. पण तुम्ही घेतलेल्या शिक्षण आणि स्किल्स नुसार लवकरात लवकर हा निर्णय घेणे कधीही चांगले.
Parents साठी Practical Guidance
12वी Arts नंतर अनेकदा Parents म्हणतात:
- “Arts घेतलंस, आता पुढे काय करणार?”
हा प्रश्न चुकीचा नाही. पण त्याचं उत्तर फक्त “BA” किंवा “Government Job” एवढाच नसायला पाहिजे.
Parents ने मुलासोबत शांतपणे खालील गोष्टी वर Detailed Discussion करावे:
| Questions | Why Important? |
|---|---|
| कोणता Subject आवडतो? | Degree Selection |
| Government Job मध्ये Interest आहे का? | Exam Planning |
| Law आवडतो का? | Law Path |
| Psychology/People-related Field आवडतो का? | Career Direction |
| Writing/Media आवडते का? | Journalism/Content |
| Creative Field आवडतो का? | Design/Media |
| Budget किती आहे? | College Selection |
| दुसऱ्या शहरात शिकणार का? | Hostel + Travel Planning |
एक खासCareer Tip
- 12वी Arts नंतर Career निवडताना “Arts ला Scope आहे का?” यापेक्षा “माझ्याजवळ कोणता Interest, Skills आणि Future Goal ला मार्ग Match होतो?” हा प्रश्न जास्तचा महत्त्वाचा आहे.
12वी Arts नंतर Courses – Career Options
12वी Arts झाल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न फक्त “BA करायचे की नाही?” एवढाच नसतो.
Arts विद्यार्थ्यांसाठी graduation, professional courses, law, psychology, journalism, design, hospitality, digital skills, competitive exams आणि entrepreneurship असे अनेक वेगवेगळे routes असू शकतात.
पण एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे:
- Course निवडताना फक्त course चे नाव पाहू नका; त्या course नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे हे आधी ठरवा.
उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला Psychology आवडत असेल तर BA Psychology हा एक मार्ग असू शकतो. दुसऱ्याला government exams मध्ये interest असेल तर BA Political Science, History, Economics किंवा Public Administration यापैकी subject combination उपयोगी ठरू शकते.
12वी Arts नंतर कोणते Courses करता येतात?
खालील table मध्ये major options एकाच ठिकाणी पाहूया.
| Course / Field | कोणासाठी योग्य? | पुढील Career Direction |
|---|---|---|
| BA General | विविध subjects मध्ये interest | Government, Teaching, Competitive Exams, Private Jobs |
| BA Psychology | Human behaviour मध्ये interest | Psychology, HR, Counselling-related higher study |
| BA Political Science | Politics, Constitution, Administration interest | UPSC/MPSC, Law, Public Administration |
| BA History | History आणि research आवडते | Teaching, Research, Competitive Exams |
| BA Geography | Geography, environment interest | Teaching, GIS-related higher study, Government Exams |
| BA Economics | Economics, numbers आणि analysis | Banking, Finance, Analytics, Government Exams |
| BA Sociology | Society आणि social issues interest | Social Work, Research, HR, NGOs |
| BA English | English, literature, writing | Content, Teaching, Media, Communication |
| BA Marathi | Marathi language/literature interest | Teaching, Writing, Publishing, Media |
| BA Public Administration | Administration मध्ये interest | Government Exams, Public Administration |
| 5-Year Integrated LLB | Law आणि legal field मध्ये interest | Legal profession, Compliance, Legal Support |
| Journalism / Mass Communication | News, media, communication | Journalism, Digital Media, Content |
| BSW | Social sector मध्ये interest | NGOs, Social Sector, Community Work |
| Hotel Management | Hospitality आणि customer service | Hotels, Hospitality, Travel |
| Travel & Tourism | Travel industry interest | Tourism, Travel Operations, Hospitality |
| Fashion Design | Fashion आणि creativity | Fashion, Styling, Merchandising |
| Graphic Design | Visual creativity | Design, Branding, Digital Media |
| Animation/VFX | Creative + technology | Animation, VFX, Media |
| Interior Design | Space/design interest | Interior Design, Design Firms |
| Fine Arts | Drawing/visual arts | Art, Design, Creative Industries |
| Digital Marketing | Online business/marketing | SEO, Social Media, Performance Marketing |
| Content Writing | Writing आवडते | Blogs, Media, Content Teams |
| Event Management | Planning आणि communication | Events, Brand Activations |
| Photography | Photography/video interest | Media, Freelance, Content |
| Foreign Languages | Languages शिकण्याची आवड | Translation, Teaching, Communication |
Degree + Skill हा Combination का उपयोगी आहे?
आज graduation पूर्ण केल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना practical skills वेगळ्या शिकाव्या लागतात. म्हणून तुम्ही १२वी आर्टस् नंतर हा विचार केला पाहिजे:
| Degree | Extra Skill |
|---|---|
| BA English | Content Writing + SEO |
| BA Marathi | Writing + Editing |
| BA Economics | Excel + Data Analysis |
| BA Political Science | Current Affairs + Writing |
| BA Psychology | Communication + Research Skills |
| BA Geography | GIS-related skills |
| BA General | Excel + Digital Marketing |
| BA History | Research + Content |
| BA Sociology | Research + Communication |
| BA + Any Subject | Computer + English Communication |
हा approach degree ला practical skill सोबत योग्यपद्धतीने जोडतो.
12वी Arts नंतर कोणता मार्ग निवडायचा?
शेवटी तुम्ही तुमच्या आवडीने decision घेऊन खालीलपैकी एका broad route निवडावे:
Route 1 – Traditional Graduation
12वी Arts → BA → MA / Job / Competitive Exams Traditional Route.
Route 2 – Law
12वी Arts → 5-Year Integrated LLB → Legal Career Path
Route 3 – Psychology
12वी Arts → BA Psychology → Higher Study → Psychology-related Career
Route 4 – Media
12वी Arts → Journalism/Mass Communication → Media/Digital Content
Route 5 – Social Sector
12वी Arts → BSW → MSW → Social Sector
Route 6 – Creative
12वी Arts → Design/Fine Arts/Animation → Portfolio → Creative Career
Route 7 – Digital
12वी Arts → BA + Digital Marketing/SEO/Content → Digital Career
Route 8 – Government Exams (Genuine Interests)
12वी Arts → BA → UPSC/MPSC/Other Competitive Exams
Final Takeaway
12वी Arts नंतर options ची काही कमी नाही; उलट problem अनेकदा options जास्त असल्यामुळे decision घेण्यात येतो.
तुमच्यासाठी योग्य course शोधताना हे 5 प्रश्न स्वतःला नक्की विचारा:
- मला कोणता subject genuinely आवडतो?
- मला Government, Private, Creative, Legal, Media की Business field मध्ये जायचे आहे?
- मला पुढे postgraduate study करायची तयारी आहे का?
- मी degree सोबत कोणती practical skill शिकू शकतो?
- माझ्या budget आणि location नुसार कोणता college/course realistic आहे?
एक practical rule लक्षात ठेवा:
- “फक्त degree निवडू नका; degree + skill + experience असा career plan तुम्ही भक्कम करा..”
उदाहरणार्थ, BA करत असाल तर तीन वर्षे फक्त exams देण्यात न घालवता communication, computer, writing, internship किंवा field-specific skills हळूहळू स्वतःमध्ये build करा.
12वी Arts नंतर course निवडला की पुढचा मोठा प्रश्न असतो— “Admission कसे घ्यायचे?”
यानंतर लगेच दुसरे प्रश्न येतात:
- Government college की Private college?
- Scholarship मिळेल का?
- BA करताना UPSC/MPSC ची तयारी कधी सुरू करायची?
- 12वी नंतर Government Job मिळू शकते का?
- कोणते skills शिकायचे?
- Graduation ची तीन वर्षे कशी वापरायची?
Government College vs Private College
हा प्रश्न जवळपास प्रत्येक विद्यार्थी किंवा parents ना पडतोच पडतो. पण decision फक्त “Government = चांगले, Private = वाईट” असा फरक तर अजिबात करू नये.
College compare करताना खालील factors पहा:
| Factor | Government College | Private College |
|---|---|---|
| Fees | अनेकदा तुलनेने कमी असू शकतात | Institution नुसार बदलतात |
| Infrastructure | College नुसार | College नुसार |
| Faculty | Department नुसार | Department नुसार |
| Location | उपलब्धतेनुसार | उपलब्धतेनुसार |
| Activities | College नुसार | College नुसार |
| Internship | उपलब्धतेनुसार | College नुसार |
| Hostel | प्रत्येक ठिकाणी नसते | Institution नुसार |
| Placement | Course/college नुसार | Course/college नुसार |
| Admission | Rules नुसार | Rules नुसार |
एक Practical rule
College निवडताना फक्त building किंवा advertisement पाहून प्रवेश घेऊ नका.
Syllabus, faculty, fees, location, student activities, internships, higher-study options आणि available facilities यांची तुलना करून एक समजदारीने निर्णय घ्या.
Degree सोबत कोणते Skills शिकावेत?
Arts विद्यार्थ्यांसाठी काही transferable skills भविष्यात खूप उपयोगी पडतात.
1. Communications
मराठी + Basic English communication improve करणे कधीही चांगले.
2. Computer Skills
ह्या काही बेसिक स्किल्स ज्या तुम्हाला आल्या पाहिजेत.
- MS Word
- Excel
- PowerPoint
- Google Docs
3. Writing
- Marathi writing
- English writing
- Report writing
- Blog writing
4. Digital Skills
हे आहेत डिजिटल स्किल्स जे Online Work ला उपयोगी पडते.
- SEO
- WordPress
- Social Media
- Basic Analytics
5. Presentation
PowerPoint + Public Speaking.
Entrepreneurship करायचे असेल तर?
Arts background असला तरी business तुम्हालाही करता येतो. पण business सुरू करण्यापूर्वी market समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ:
- Local service business
- Digital agency
- Content business
- Education-related service
- Tourism-related business
- Event service
- Design service
- E-commerce
Students formula
Skill → Small Service → First Customer → Feedback → Better Service → Business
सुरुवातीला मोठे investment करण्यापेक्षा छोट्या- छोट्या scale वर idea test करून practically आमलात आणणे.
12वी Arts नंतर 3-Year Career Roadmap
आता सर्वात practical भाग.
Year 1 – Foundation पहिल्या वर्षी:
विद्यार्थ्याने हे केले पाहिजे:
- College subjects व्यवस्थित समजून घ्या.
- Notes बनवा.
- Writing improve करा.
विद्यार्थ्याने हे Skill शिकले पाहिजे:
एक skill निवडा:
- Excel
- Digital Marketing
- SEO
- Design
- Content Writing
- Video Editing
Personal Learning:
- English communication
- Public speaking
- Reading habit
Goal: पहिल्या वर्षी तुम्ही Foundation वर भर द्यायचा असतो.
Year 2 – Skill + Experience दुसऱ्या वर्षी:
- Internship शोधणे.
- Small projects करणे.
- Portfolio तयार करणे.
- LinkedIn/profile तयार करा.
- Freelancing test करा.
- Competitive exam preparation असल्यास syllabus-based study करणे.
Goal:
“मी काय करू शकतो?” याचे उत्तर शोधणे
उदाहरण:
Content Writing student कडे 10–15 good writing samples तयार करण्याचं प्रयत्न करणे.
Digital Marketing student कडे sample SEO projects तयार करणे.
Year 3 – Career Direction
Final year मध्ये तुमची direction स्पष्ट असावी.
Option A – Job Resume + Internship + Applications याचे उत्तर स्पष्ट असायला हवे..
Option B – Higher Education MA / MBA / Law / MSW / संबंधित PG course करण्याचा विचार ही चांगला..
Option C – Government Exams Exam-specific preparation तुमची झाली असेल तर.
Option D – Freelancing Clients + Portfolio + Service System जर तुम्हाला काहीतरी वेगळा मार्ग करण्याचा असेल..
Option E – Business Validated idea + customers + basic business model.
Backup Plan असणे म्हणजे Failure नाही
Career planning मध्ये backup ठेवणे practically कधीही चांगले आहे. उदाहरण:
जर तुमचा Primary Goal
MPSC/UPSC करणे हा असेल तर त्यासाठी ही एक Backup Plan आहे.
Backup Plan
BA + Skill + Private Job करून तुम्ही करिअर बनवू शकता. Backup Plan म्हणजे प्राथमिक गोल सोडणे नाही तर त्याच्याबरोबर एक समांतर करिअर.
12वी Arts नंतर काय करू नये?
❌ फक्त salary पाहून course घेऊ नका
Salary role आणि experience तुम्ही केलेल्या कामामुळे व तुमच्याकडे असलेल्या स्किल नुसार बदलला जाऊ शकतो.
❌ फक्त social media reels पाहून career decision घेऊ नका
Short videos तुमच्या पूर्ण करिअर चे चित्र स्पष्ट करत नाही. त्यामुळे ही चूक तुम्ही टाळली पाहिजे.
❌ College advertisement म्हणजे complete information असे समजू नका
Official course details आणि university information जाणीवपूर्वक वाचून तुम्ही पुढचा निर्णय घेणे हे कधीही योग्य.
❌ Degree पूर्ण होईपर्यंत skill development न शिकणे.
First year पासून तुम्ही छोटे छोटे स्किल्स हे शिकू शकता.
❌ प्रत्येक Government Exam साठी एकाच वेळी preparation करणे
एक clear exam direction ठेवलेला कधीही तुमच्या भविष्यासाठी अधिक चांगला.
❌ English weak आहे म्हणून career options बंद झाले असे समजणे
English improve करता येते.
❌ Arts घेतल्याबद्दल regret करत बसू नका
हा विचार मनातून काढून चांगल्या भविष्याचा विचार करणे कधीही चांगले.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न १: १२वी आर्ट्सनंतर LLB करण्यासाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?
उत्तर: महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी विधी महाविद्यालयांमध्ये ५ वर्षांच्या B.A. LLB प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाची MH-CET Law (5 Years) परीक्षा देणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला देशातील सर्वोच्च नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये (NLUs) जायचे असेल, तर राष्ट्रीय पातळीवरील CLAT (Common Law Admission Test) द्यावी लागते.
प्रश्न २: १२वी आर्ट्सनंतर MBA करता येते का?
उत्तर: होय, नक्कीच! कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A., B.Com, B.Sc) MBA करण्यासाठी १००% पात्र असतो. B.A. पूर्ण केल्यानंतर तुम्ही IIMs साठी CAT किंवा महाराष्ट्रातील कॉलेजेससाठी MAH-MBA CET परीक्षा देऊन HR, मार्केटिंग किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये MBA करू शकता.
प्रश्न ३: आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट हा चांगला पर्याय आहे का?
उत्तर: अत्यंत उत्तम पर्याय आहे! BHM (Bachelor of Hotel Management) किंवा B.Sc Hospitality Studies या कोर्सेसमध्ये १२वी आर्ट्सचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तारांकित हॉटेल्स (Taj, Oberoi), आंतरराष्ट्रीय क्रूझ शिप्स आणि एव्हिएशन (विमानसेवा) मध्ये शेफ, फ्रंट ऑफिस मॅनेजर आणि फूड अँड बेव्हरेज मॅनेजर म्हणून जगभर नोकरीच्या संधी मिळतात.
प्रश्न ४: १२वी आर्ट्सनंतर मुलींसाठी कोणती करिअर क्षेत्रे सर्वाधिक सुरक्षित आणि सन्मानजनक मानली जातात?
उत्तर: मुलींसाठी विधी सेवा (कॉर्पोरेट लॉयर / ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट), प्राध्यापक व शिक्षक पद (B.Ed/NET-SET द्वारे), बाल व कुटुंब मानसशास्त्र, नागरी सेवा (MPSC/UPSC), आणि UI/UX किंवा फॅशन डिझायनिंग हे पर्याय अत्यंत सुरक्षित, प्रतिष्ठित आणि स्वतंत्र ओळख निर्माण करून देणारे मानले जातात.
अंतिम निष्कर्ष (Editorial Advice)
१२वी आर्ट्स ही कोणत्याही मर्यादांची चौकट नसून अनंत संधींचे खुले आकाश आहे. नागरी प्रशासनाची सत्ता असो, कोर्टातील न्यायाची लढाई असो, मीडियाचा आवाज असो किंवा डिजिटल डिझाईनची कल्पकता—आर्ट्सचे विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत.
स्वतःची आवड ओळखा, संवाद आणि लेखन कौशल्य सुधारा, आणि पदवीच्या ३ वर्षांचा उपयोग स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी करा.
महाराष्ट्रातील सर्व CET प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक, प्रवेश प्रक्रिया, मेरिट लिस्ट, सरकारी भरती आणि निकालांच्या अधिकृत माहितीसाठी maharozgar.in ला नियमित भेट देत राहा!