Interest की Salary Career निवडताना नेमके काय पाहावे?

Career Overview Card

Eligibility

Fees

Skills

Duration

Scope

Age Limit

---

IMPORTANT LINKS

Interest की Salary Career निवडताना नेमके काय पाहावे? Full Guide 2026

आयुष्यात १०वी, १२वी किंवा पदवीचा टप्पा ओलांडताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या डोक्यात सतत एकाच विचारांचे चक्र चालू असते: “मी माझ्या आवडीचे (Interest / Passion) क्षेत्र निवडावे की ज्या क्षेत्रात भरमसाठ पगार (High Salary / Money) मिळतो त्या मार्गाला मी जावे?”

कधी एखाद्या विद्यार्थ्याला Drawing, Writing, Teaching किंवा Sports मध्ये Genuine Interest असते; पण घरातून Engineering, Medical, Government Job किंवा IT field निवडण्याचा सल्ला दिला जातो.

दुसरीकडे काही students म्हणतात, “Interest काहीही आणि कोणताही असो, मला Future मध्ये चांगली Salary हवी.”

खरं सांगायचं तर Career decision फक्त Interest किंवा फक्त Salary पाहून निर्णय घेणे योग्य नाही. Career निवडताना Interest, Strength, Skills, Education, Job Market, Income Potential आणि स्वतःची असलेली परिस्थिती या सगळ्यांचा एकत्रित विचार करणे अधिक Practical ठरते. Career guidance चा उद्देशही Students ना Detailed Informed career choice करण्यास मदत करणे हा आहे.

image edited

या दोन टोकांच्या विचारांमध्ये सापडलेला सामान्य तरुण हा गोंधळून जातो. आवडीच्या मागे धावले आणि पगार मिळाला नाही तर काय करायचे? किंवा भरपूर पगाराच्या मागे धावून रोज सकाळी कामावर जाताना जीव नकोसा वाटतो तर त्या पैशाचा काय उपयोग? असे अनेकसे विचार हे फिरताच राहतात

हा लेख कोणत्याही हवेतील तत्त्वज्ञानावर आधारित नसून, मानसिक समाधान, आर्थिक वास्तव, महागाई, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि करिअरच्या दीर्घकालीन विकासाची (30-Year Career Horizon) वस्तुनिष्ठ सांगड घालून देणारा गाईड आहे.

Quick Comparison: Interest vs Salary

निकष (Parameters)केवळ आवडीवर आधारित करिअर (Pure Interest / Passion)केवळ पगारावर आधारित करिअर (Pure High Salary / Money)संतुलित सुवर्णमध्य (The Balanced Career Model)
कामाचा उत्साह (Daily Motivation)अत्यंत उच्च; काम करताना थकवा जाणवत नाहीसुरुवातीला उच्च; १-२ वर्षांनंतर मोनोटोनस व कंटाळवाणेस्थिर व दीर्घकाळ टिकणारा
सुरुवातीचे आर्थिक स्थैर्यअनेकदा कमी किंवा अनिश्चित (Struggling Phase)तात्काळ आर्थिक स्थैर्य आणि चांगला लाइफस्टाइल स्तरमध्यम ते चांगला सुरुवातीचा पगार
मानसिक ताण व बर्नआऊटकमी ताण; आत्मिक समाधान (Fulfilment) जास्तउच्च कॉर्पोरेट ताण, डिप्रेशन व बर्नआऊटचा धोकानियंत्रित कामाचा ताण व उत्तम वर्क-लाईफ बॅलन्स
कौशल्यांचा विकास (Skill Growth)आवडीमुळे स्वतःहून नवीन गोष्टी शिकण्याची तयारीकेवळ कामापुरते काम; नवीन शिकण्याची इच्छा मंदावतेबाजारपेठेच्या गरजेनुसार सातत्यपूर्ण अपस्किलिंग
मंदीच्या काळातील टिकावजर कौशल्याला मागणी नसेल तर जगणे कठीणकंपनीतील ले-ऑफ (Layoffs) ची टांगती तलवारआवश्यक कौशल्ये असल्याने मागणी कायम
दीर्घकालीन यश (१०-१५ वर्षांनंतर)जर सातत्य ठेवले तर त्या क्षेत्रातील सर्वोच्च तज्ज्ञपैशांची बचत; परंतु करिअर बदलण्याची तीव्र इच्छाआर्थिक स्वातंत्र्य आणि व्यावसायिक प्रतिष्ठा दोन्ही

Interest म्हणजे नेमकं काय?

Interest म्हणजे एखादी गोष्ट करण्यात आपल्यात असलेली असलेली नैसर्गिक आवड. “तुम्हाला आवडणारे काम करा, म्हणजे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही,” हे वाक्य वाचायला जितके सुंदर वाटते, तितके ते प्रत्यक्ष जगण्यात सोपे असेलच असे नाही.

उदाहरणार्थ:

  • एखाद्याला Computer वर Genuinely काम करायला आवडते.
  • कोणाला Mathematics आणि problem solving करायला जास्त आवडते.
  • कोणाला लोकांशी बोलणे आणि त्यांना समजावून सांगणे जास्त आवडते.
  • कोणाला Writing, Drawing किंवा Content Creation मध्ये जास्त आवड असते.
  • कोणाला Machines, Electrical किंवा Technical कामामध्ये Genuine Interest असतो.
  • कोणाला Government service आणि Public Administration मध्ये Interest असतो.

पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे.

आवडीचे करिअर निवडण्याचे फायदे:

  1. अफाट ऊर्जा आणि सातत्य (Boundless Energy):
    • जेव्हा एखादे काम तुम्हाला मनापासून आवडते, तेव्हा घड्याळाकडे न पाहता तुम्ही तासनतास त्यात रमून जाता. आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी कोणाला सांगावे लागत नाही.
  2. कौशल्याचा सर्वोच्च स्तर (Mastery):
    • आवड असणारी व्यक्ती त्या विषयात इतकी खोल जाऊन शिकण्यात मग्न असते की काही वर्षांत ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ (Authority) बनते.
  3. मानसिक शांती आणि आरोग्य:
    • स्वतःच्या आवडीचे काम करणाऱ्या लोकांमध्ये कामाचा ताण जाणवत नाही. ऑफिस संपल्यावरही ते उत्साही असतात आणि कौटुंबिक नातेसंबंध चांगले राहतात.

केवळ आवडीवर अवलंबून राहण्याचे धोके:

  • प्रत्येक आवड ही ‘व्यवसाय’ (Marketable Career) असू शकत नाही:
    • तुम्हाला निसर्गाचे फोटो काढायला आवडतात किंवा गिटार वाजवायला आवडते, हा तुमचा छंद (Hobby) आहे. परंतु त्या छंदासाठी लोक तुम्हाला दरमहा ₹५०,००० देण्यास तयार आहेत का? जर तुमच्या आवडीला बाजारात आर्थिक मूल्य (Economic Value) नसेल, तर ती आवड तुम्हाला उपाशी ठेवू शकते.
  • आर्थिक संकटांमुळे आवडीचा तिरस्कार होणे:
    • जेव्हा घरात किराणा भरण्यासाठी पैसे नसतात किंवा हॉस्पिटलाचे बिल भरता येत नाही, तेव्हा तीच अत्यंत आवडणारी गोष्ट तुम्हाला ओझे वाटू लागते. गरिबी आणि आर्थिक विवंचनेमुळे आवडीची जागा चिडचिड आणि नैराश्य घेते.
  • दीर्घ संघर्ष (Long Struggle Period):
    • कला, क्रीडा, अभिनय किंवा स्वतंत्र लेखनात यश मिळण्यासाठी अनेकदा ५ ते १० वर्षे काढावी लागतात. इतका काळ टिकून राहण्यासाठी कुटुंबाचा भक्कम आर्थिक आधार आवश्यक असतो, जो प्रत्येकाकडे नसतो.

Career साठी स्वतःला विचारावे लागते:

“मला ही गोष्ट फक्त आवडते की मी त्यामध्ये सातत्याने शिकून चांगले काम करू शकतो का?”

Salary महत्त्वाची आहे का?

हो. Salary नक्कीच महत्त्वाची बाब आहे. Career हा फक्त Passion चा विषय नाही. भविष्यातील living Expenses, Family Responsibilities, Financial goals आणि lifestyle या सर्व बाबींचा भविष्यासाठी विचार करावा लागतो.

उदाहरणार्थ, दोन Careers तुम्हाला Equally Interesting दिसत जरी असतील. त्यापैकी एका Career मध्ये Education cost जास्त आहे, तर दुसऱ्यामध्ये कमी. एका field मध्ये कामाच्या संधी तुमच्या शहराजवळ आहेत, तर दुसऱ्यासाठी relocation आवश्यक आहे.

केवळ उच्च पगाराची निवड करण्याचे फायदे:

  1. लवकर आर्थिक स्वातंत्र्य (Early Financial Freedom):
    • वयाच्या २२ ते २५ व्या वर्षी दरमहा ₹६०,००० ते ₹१,००,०००+ पगार हातात पडल्यामुळे शिक्षणाचे कर्ज फेडणे, स्वतःचे घर किंवा वाहन घेणे आणि कुटुंबाला सुखसमाधानीचे आयुष्य देणे शक्य होते.
  2. समाजातील प्रतिष्ठा आणि पत:
    • समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमच्या पगाराच्या आकड्यावरून तुमची किंमत ठरवली जाते. चांगला पगार असल्यावर बँकांकडून सहज कर्ज मिळते आणि सामाजिक पत वाढते.
  3. महागाईचा मुकाबला करण्याची ताकद:
    • आजच्या वाढत्या महागाईच्या काळात उत्तम वैद्यकीय उपचार, मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि आकस्मिक आपत्कालीन संकटांना सामोरे जाण्यासाठी बँक बॅलन्स हाच सर्वात मोठा आधार ठरतो.

केवळ पैशाच्या मागे धावण्याचे छुपे धोके (The Dark Side of High Salary):

  • कामाचा भयानक ताण आणि बर्नआऊट (Burnout):
    • ज्या कंपन्या सुरुवातीलाच दरमहा लाखो रुपयांचे पॅकेज देतात, त्या तुमच्याकडून दिवसाचे १२ ते १४ तास सलग काम आणि Weekends कुर्बानी मागतात. आवडीचा अभाव असल्यास असा ताण वर्ष-दोन वर्षांत शारीरिक व मानसिक आजारांना (बीपी, डायबिटीस, डिप्रेशन) आमंत्रण देतो.
  • सकाळी उठण्याचा कंटाळा (Sunday Night Dread):
    • दर रविवारी संध्याकाळी “उद्या पुन्हा ऑफिसला जावे लागणार” या विचाराने जर छातीत धडधड होत असेल, तर तो पगार तुमच्या आनंदाची किंमत मोजून घेतलेला असतो.
  • पगारवाढ झाली तरी असमाधान (The Hedonic Treadmill):
    • जसजसा पगार वाढतो, तसतसा खर्च आणि राहणीमानाचा दर्जा वाढतो. परंतु कामात आंतरिक समाधान नसल्याने मन कायम अशांत राहते आणि माणूस एका ‘गोल्डन केज’ (Golden Cage) मध्ये अडकतो, जिथून पगार सोडवत नाही आणि कामही करवत नाही. अशा परिस्थिती मध्ये तो अडकून जातो.

योग्य करिअर कसे निवडावे? ४-स्टेप प्रॅक्टिकल फ्रेमवर्क

विद्यार्थ्यांनी आणि नोकरदारांनी करिअर निवडताना खालील ४-स्टेप वैज्ञानिक फॉर्म्युलाचा वापर करून बनवला आहे.:

                    [ पायरी १: आवडीचे प्रामाणिक विश्लेषण (Hobby vs Skill) ]
                                              ⬇
                    [ पायरी २: बाजारातील आर्थिक मागणी तपासा (Market Demand) ]
                                              ⬇
                    [ पायरी ३: कौटुंबिक आर्थिक वास्तवाची पाहणी (Runway Check) ]
                                              ⬇
                    [ पायरी ४: '८०/२०' करिअर मॉडेलची अंमलबजावणी (The 80/20 Rule) ]

पायरी १: Hobby आणि Marketable Skill मधील फरक ओळखा

  • छंद (Hobby): ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो, परंतु त्यासाठी कोणी पैसे देण्यास बांधील नाही (उदा. चित्रपट पाहणे, प्रवास करणे, गाणी ऐकणे). असे काही छंद तुमच्यासाठी वयक्तिक असावे.
  • बाजारपेठीय कौशल्य (Skill): ज्या कामातून लोकांची किंवा कंपन्यांची कोणतीही समस्या (Problem) सुटते आणि त्या बदल्यात ते तुम्हाला पैसे देतात. असे स्किल्स तुम्हाला भविष्यात खूप उपयुक्त आहेत.
  • तुमचे काम: तुमच्या आवडीचे रूपांतर अशा कौशल्यात करा ज्याची बाजारात किंमत आहे. उदा. प्रवास करण्याची आवड असेल, तर ‘ट्रॅव्हल ब्लॉगर’, ‘टूर मॅनेजर’ किंवा ‘हॉस्पिटॅलिटी कन्सल्टंट’ चे व्यावसायिक कौशल्य शिका.

पायरी २: ‘कौशल्य मागणी’ (Skill Demand) तपासा

तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रातील पुढील गोष्टी गुगलवर किंवा LinkedIn वर नक्कीच तपासा: या बाबींचा तुम्हाला भविष्यासाठी खूप उपयोग होणार आहे.

  1. या क्षेत्रात पुढील १० वर्षांत रोजगाराच्या संधी वाढणार आहेत की कमी होणार आहेत?
  2. या पदावर काम करणाऱ्या मध्यम अनुभवी (३ ते ५ वर्षे अनुभव) माणसाचा सरासरी पगार किती आहे?
  3. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कामाचे तास आणि ताण किती असतो?

पायरी ३: घरची आर्थिक परिस्थिती आणि रनवे (Financial Runway)

  • जर तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असेल: सुरुवातीला Salary ला प्रथम प्राधान्य (८०%) आणि आवडीला दुय्यम प्राधान्य (२०%) द्या. आधी स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक संकट दूर करा. आर्थिक पाया मजबूत झाल्यावर नंतर आवडीच्या क्षेत्रात शिफ्ट होणे तुमच्यासाठी सहज शक्य होऊन जाते.
  • जर कुटुंबाचा भक्कम आर्थिक आधार असेल: तर तुम्ही बिनधास्तपणे Interest ला प्रथम प्राधान्य (८०%) देऊन स्वतःच्या पॅशनसाठी सुरुवातीची २-३ वर्षे संघर्षाची जोखीम घेऊ शकता.

पायरी ४: ‘८०/२०’ चा सुवर्ण करिअर नियम (The 80/20 Rule)

ज्या नोकरीमध्ये ८०% काम तुमच्या क्षमतेचे आहे आणि चांगला पगार देते, तसेच किमान २०% काम तुम्हाला शिकायला आवडते, ती नोकरी तुमच्यासाठी परिपूर्ण असते! जगात १००% परिपूर्ण आणि रोजची मजा देणारी कोणतीही नोकरी अस्तित्वात अजून तरी नाही; अगदी शास्त्रज्ञ, क्रिकेटर्स आणि मोठ्या CEO ना सुद्धा त्यांच्या कामातील ३०% कंटाळवाणी कागदपत्रे आणि मीटिंग्ज सांभाळावीच लागतात.

10वीच्या Students साठी काय महत्त्वाचे?

10वीच्या विद्यार्थ्यांनी लगेचच “माझी lifetime Salary किती असेल?” यावर विचार करण्याची गरज नाही. या stage वर अधिक महत्त्वाचे प्रश्नावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.:

  1. मला कोणकोणते subjects आवडतात?
  2. कोणत्या विषयामध्ये माझी भक्कम Strength आहे?
  3. मला Theoretical की Practical learning जास्त आवडते?
  4. लोकांसमवेत काम करणे आवडते की Machines/computers सोबत?
  5. पुढील 2–3 वर्षांत कोणकोणते Career areas मला Explore करता येतील?

10वीच्या stage वर Career exploration करणे जास्त महत्त्वाचे असते.

उदाहरणार्थ: Science, Commerce, Arts, Diploma, ITI किंवा इतर Vocational Courses यांची Basic माहिती घेऊन स्वतःसाठी कोणता Learning environment Suit होतो हे समजून घेणे.

12वीच्या Students साठी काय बदलते?

12वीच्या वेळी Decision हा थोडा Specific & Practical होतो. हे प्रश्न आता जास्त महत्वाचे असतात:

“BCA की BCom?”

“BTech की BSc?”

“Degree की Diploma?”

“Government exam preparation की Graduation Admission?”

इथे Interest सोबत Course duration, Admission requirements, Fees, Career Opportunities, Higher Studies आणि Job Culture यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. म्हणजे 12वी नंतर Career Decision हे अधिक Detailed comparison बनतो.

Career निवडताना 7 महत्त्वाचे Factors

Career shortlist करताना खालील 7 Factors वर बारकाईने लक्ष देणे गरजेचे ठरते.

Factorsस्वतःला विचारायचा प्रश्न
Interestमला हे क्षेत्र genuinely आवडते का?
Strengthमाझ्या abilities या careerला suit होतात का?
Work Natureया professionमध्ये रोजचे काम मला चालेल का?
Educationयासाठी कोणते education आणि skills लागतील?
Incomeमाझ्या expectationsशी income potential जुळते का?
Job Marketया fieldमध्ये opportunities कशा आहेत?
LifestyleWorking hours, location आणि work environment मला suit होतात का?

Factors चा उद्देश एवढाच की एकाच Factor वर विसंबून तुम्ही करिअर चा निर्णय घेऊ नका.

Future Scope म्हणजे काय?

“या Career ला Future मध्ये Scope आहे का?” हा प्रश्न अनेक विद्यार्थी खूप वेळा विचारतात. पण Future Scope म्हणजे फक्त आज किती Jobs आहेत एवढेच राहत नाही.

पुढील गोष्टी पाहणे देखील गरजेचे आहे.:

  • Technologyचा Impact किती प्रमाणात आहे.
  • Industryमध्ये Demand किती प्रमाणात आहे.
  • भविष्यामध्ये New roles तयार होत आहेत का?
  • Skills बदलत आहेत का?
  • Career मध्ये Specialization चे Options किती आहेत?
  • Higher Studies नंतर पुढील कोणकोणते Opportunities आहेत?
  • एका Role मधून दुसऱ्या Related role मध्ये जाण्यासाठी काय करावे लागते?

Career Fields नवीन वर्षात बदलत असतात. त्यामुळे आजचा Trend पाहून आयुष्य भाराचा निर्णय घेणे योग्य नाही.

Work-Life Balance विसरू नका

हा Factor अनेक विद्यार्थी शेवटी निर्णय घेण्यासाठी ठेवतात. पण तुम्ही भविष्यातील Career मध्ये रोज अनेक तास काम करणार असाल तर Work Environment बद्दल जाणून घेणे महत्वाचे ठरते. स्वतःला विचारा:

“मला Office-based काम आवडेल का?”

“मी Field work करण्यासाठी तयार आहे का?”

“Regular working hours मला किती प्रमाणात आवडते?”

“Shift-based Working Culture मला चालेल का?”

“लोकांशी सतत Interaction करणे माझ्यासाठी Comfortable आहे का?”

Career Decisionमध्ये “Parents काय म्हणतात?” याची भूमिका

Parents चा या सर्वामध्ये अनुभव खूप महत्वाचा ठरतो. त्यांना Financial stability, Education cost, Safety आणि Future security ची चिंता लागून राहिलेली असते पण career discussion फक्त:

“माझ्या मुलाने हेच करावे.” त्याने दुसरा कोणताही निर्णय घेऊ नये. हा विचार करू नये.

त्याऐवजी Students आणि Parents नी एकत्रित यावर विचार करणे योग्य:

  • हा Career का निवडायचा?
  • त्यासाठी कोणते Qualification योग्य ठरेल?
  • पूर्ण शिक्षणासाठी किती खर्च येऊ शकतो?
  • भविष्यामध्ये कामाचे स्वरूप काय आहे?
  • पुढे कोणकोणते Options आहेत?
  • दुसरा Suitable option कोणता?

Career counselling चा उद्देशही Students ला Information आणि Confidence देऊन योग्य भविष्याचा निर्णय घेण्यास प्रवृत्त करणे होय.

Career Final करण्यापूर्वीची 10-Point Checklist

Career final करण्यापूर्वी खालील checklist वर एक नजर देणे गरजेचे आहे:

1. जो मी Field निवडणार आहे त्यामध्ये Genuine Interest आहे का?

2. माझ्या Strengths कोणत्या करिअर ला उपयोगी आहेत?

3. या Professionचे Actual daily work ची माहिती घेतली आहे का?

4. कोणता Course किंवा Qualification माझ्यासाठी योग्य?

5. Admission process आणि Educational Paths मला किती समजला आहे?

6. Course ची Fees आणि कालावधी माझ्यासाठी बनलेला आहे का?

7. Career मध्ये Income potential आणि Growths Detailed समजून घेतली आहे का?

8. Working environment आणि lifestyle मला Suit होईल का?

9. माझा Plan B तयार आहे का?

10. माझा हा Decision स्वतःच्या Research वर घेत आहे की फक्त Pressure मुळे?

जर यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरे अजून तुमच्यासाठी Unclear असतील, तर करिअर बद्दलचा निर्णय लवकर घेणे चुकीचे ठरू शकते. Career निवडताना दुसऱ्याची Success Story Copy करण्यापेक्षा स्वतःची Strengths, Interests आणि Future needs समजून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

Interest तुम्हाला दिशा देऊ शकते. Salary तुम्हाला practical reality दाखवते. पण योग्य Career Decision या दोन्हींसोबत तुमची Strength, Work Nature, Education, Job Market आणि Personal Situation समजून घेतल्यावर तयार होतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न १: जर मला स्वतःचा खरा इंटरेस्ट कशात आहे हे माहितच नसेल तर मी काय करावे?

उत्तर: ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष काम करत नाही, तोपर्यंत कशात आवड आहे हे समजत नाही. अशा वेळी हाय-डिमांड असणारे क्षेत्र (उदा. डिजिटल मार्केटिंग, फायनान्स, कोडिंग, किंवा बिझनेस ॲनालिटिक्स) निवडा आणि काम करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही एखाद्या कामात मेहनत घेऊन चांगले बनू लागता, तेव्हा त्या कामात आपोआप आवड निर्माण होऊ लागते! (Competence breeds passion).

प्रश्न २: आवडीच्या क्षेत्रात कमी पगार असेल, तरीही ते करिअर निवडावे का?

उत्तर: जर तुमच्यावर घरातील कर्जाचा भार नसेल आणि तो पगार तुमच्या मूलभूत गरजा भागवण्याइतका पुरेसा असेल, तर निश्चितपणे निवडा. कारण आवडीच्या क्षेत्रात काम करताना तुम्ही लवकर प्रगती करता आणि त्या क्षेत्रातील ‘टॉप १०%’ लोकांमध्ये पोहोचल्यानंतर तुमचा पगार आपोआप कॉर्पोरेट क्षेत्राच्या तोडीस तोड होतो.

प्रश्न ३: जास्त पगाराची नोकरी करून आवडीचे काम पार्ट-टाइम करता येते का?

उत्तर: होय, नक्कीच! याला ‘Side Hustle Model’ म्हणतात. आठवड्यातील ५ दिवस चांगल्या पगाराची नोकरी करून आर्थिक स्थैर्य मिळवा, आणि शनिवार-रविवार किंवा संध्याकाळचे २ तास स्वतःच्या आवडीच्या कामासाठी (उदा. लिखाण, यूट्यूब, डिझायनिंग, समाजसेवा) द्या. जेव्हा तुमच्या आवडीच्या कामातून नोकरीइतकी कमाई सुरू होईल, तेव्हा तुम्ही पूर्णवेळ त्या क्षेत्रात उतरू शकता.

प्रश्न ४: करिअरच्या सुरुवातीला Interest जास्त महत्त्वाचा की Salary?

उत्तर: करिअरच्या पहिल्या ३ वर्षांत ‘Learning (कौशल्य संपादन)’ सर्वात महत्त्वाचे असते. जर एखाद्या नोकरीत पगार थोडा कमी असला पण शिकण्याची संधी मोठी असेल, तर ती नोकरी निवडावी. शिकलेले कौशल्य पुढील २५ वर्षांत तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पगार मिळवून देते.

अंतिम निष्कर्ष

Interest आणि Salary या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; ते एकमेकांचे शत्रू नाहीत.

  • जर तुम्ही केवळ पैशाच्या मागे धावलात, तर एके दिवशी तुमच्या खात्यात भरपूर पैसा असेल, पण तो खर्च करण्यासाठी मनःशांती आणि आरोग्य शिल्लक नसेल.
  • जर तुम्ही केवळ अंध आवडीच्या मागे धावलात, तर तुमच्याकडे आत्मिक समाधान असेल, पण किराणा आणि औषधांचे बिल भरण्यासाठी खिसा रिकामा असेल.

त्यामुळे जीवनात समजूतदार वास्तववादी बना.

तुमच्या आवडीचा शोध घ्या, त्या आवडीला बाजारात लागणाऱ्या कौशल्यांशी जोडा, आणि कष्ट करून त्या क्षेत्रात इतके निष्णात बना की लोकांनी तुम्हाला त्या कामासाठी भरघोस पगार दिलाच पाहिजे!

महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, शासकीय नोकऱ्यांचे अधिकृत अपडेट्स, करिअर गाईडन्स आणि निकालांच्या माहितीसाठी maharozgar.in ला नियमित भेट देत राहा!

IMPORTANT LINKS

About Maharozgar...

Maharozgar.in हे Maharashtra मधील Government Jobs, Private Jobs, Career Guidance आणि Exam Preparation संबंधित माहिती देणारे online platform आहे.

Quick Links

Get Latest Job Alerts

Maharashtra Government आणि Private Jobs चे latest updates मिळवण्यासाठी join करा.